Mahavitaran : महावितरणकडून “सन्मान सौदामिनीचा”
गोंदिया परिमंडळातील महिला कर्मचार्यांचा सत्कार
गोंदिया : स्त्री शक्तीला समर्पित नवरात्र उत्सवाला दिनांक २२.०९.२०२५ पासून प्रारंभ झालेला आहे. नवरात्रात ९ दिवसांमध्ये आदिशक्ती स्वरूप दुर्गा देवीच्या नवरूपांची पूजा केली जाते. हा उत्सव महिलांच्या शक्तीचा त्यांच्या विविध कलागुणांचा आणि त्यांच्या क्षमतेच्या गौरव करणारा असतो. महावितरण (mahavitaran) कंपनी ही वीज क्षेत्राशी निगडीत आहे , वीज ही मानवी जीवनाची मूलभूत गरज आहे. प्रामुख्याने सुरळीत व दर्जेदार वीज पुरवठा व उत्कृष्ट ग्राहकसेवेची जबाबदारी महावितरण करून पार पाडण्यात येते. विजसेवेसारख्या कठीण व जोखीमेच्या तांत्रिक क्षेत्रातमध्ये महिला अधिकारी, अभियंता, तांत्रिक कर्मचारी आपल्या पारिवारिक जबाबदारी सांभाळून, सक्षमपणे कार्यालयीन कामकाज पार पाडून नावलौकिक कमवून स्वतःला सिद्ध केले आहे.. महिलांच्या उल्लेखनीय कामगिरी ची दखल घेऊन महिला कर्मचाऱ्याचा गौरव करण्या करिता नवरात्री मध्ये “सन्मान सौदामिनीचा” कार्यक्रम राबविण्याच्या मुख्य कार्यालयाने सूचना दिल्या त्या अनुषंगाने गोंदिया परिमंडळ येथे दिनांक २९.०९.२०२५ ला महावितरण (mahavitaran) गोंदिया मधील महिला अभियंता अधिकारी / कर्मचारी यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमामध्ये गोंदिया परिमंडळ , प्रविभाग व महावितरण (mahavitaran) गोंदिया विभाग रामनगर येथे कार्यरत सर्व महिला उपस्थित होत्या . सर्व महिलांचा कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सुहास रंगारी मुख्य अभियंता यांच्या हस्ते गुलाब पुष्प व पुस्तक देऊन गौरव करण्यात आला..महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले . पारिवारिक व सामाजिक जबाबदारी स्वीकारून त्या आपले कर्तव्य पार पाडतात. मूल बाळ सांभाळून त्या आपल्या कर्तव्या वर १००% कार्यक्षमता देतात. काही महिला अभियंत्यांनी त्यांचे कंपनी मधील जूने अनुभव सांगितले. महिलांच्या समस्या व विषमता यावर भर देऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला.
अनुकंपा तत्वावर लागलेल्या महिलांनी घरचा कमावता व्यक्ती गेल्यावर केलेला संघर्षमय अनुभव व्यक्त केला व त्यांच्या जीवनावर झालेला परिणाम व त्यातून झटून कशा उभ्या राहिल्या त्यावर त्यांचं मनोगत व्यक्त केले. काही महिलांनी सावित्रीबाईनि केलेल्या योगदानाची आठवण करून देऊन त्या प्रमाणे त्यांच्या विचारांना आत्मसात करून पुढे जगण्याचा आदर्श ठेवावा असे मत मांडले. महिलाना महावितरण (mahavitaran) मध्ये काम करताना त्यांना सन्मान मिळत आहे या बद्दल खुशी व आदर आहे हे प्रामुख्याने सांगितले.महिलांनी आपले कलागुण गाण्याच्या , कवितेच्या व शायरी च्या स्वरूपात सादर केले.. सन्मान सौदामिनीचा कार्यक्रमामुळे त्यांचा परिश्रमाची दखल घेतल्या गेली, त्यांचा सन्मान करण्यात आल्यामुळे , आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सुहास रंगारी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महिलांनीं केलेल्या परिश्रमात ची दखल घेत सर्व महिलांचे कौतुक केले.. त्यांचे योगदान फार मोलाचं असून कंपनीला अग्रेसर करण्यात मोठा वाटा आहे असे प्रतिपादन केले. महिलाना काही समस्या असल्यास “वडील समजून त्या माझ्यापुढे त्यांच्या समस्या मांडू शकतात ” असा एक विश्वास अध्यक्षांनी दिला. सदर “सन्मान सौदामिनी” हा कार्यक्रम हर्षो उल्हासात पार पाडण्यात आला कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अधीक्षक अभियंता रामराव राठोड ,तसेच सहाय्यकमहाव्यवस्थापक (मां स ) सुमेध बोधी, कार्यकारी अभियंते राजीव रामटेके, आनंद जैन, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अनंत चवरे, सहाय्यक विधी अधिकारी प्रशांत मडावी व इतर मान्यवर उपस्थित होते.. कार्यक्रमाचे सूत्र संचालन गणेश चव्हाण यांनी केले.

