LatestNewsगोंदियाराजकीय

शहरातील अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

गोरेगाव : गोरेगांव शहरातील अनेक कार्यकर्त्यांनी  माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.  आज (ता.२६) खासदार   प्रफुल पटेल यांचे जनसंपर्क कार्यालय पाल चौक गोंदिया येथे पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. सर्व पक्ष प्रवेशितांचे माजी आमदार जैन यांनी पुष्पगुच्छ व पक्षाचा दुपट्टा देवून राष्ट्रवादीत स्वागत केले.
खा.प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वावर व विकासवादी धोरणांवर विश्वास ठेवून गोरेगाव नगरातील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दुपट्टा देवून पक्षात स्वागत करण्यात आले. पक्ष प्रवेश करणार्‍यांमध्ये कैलास वाघाडे, विलास वाघाडे, देवेंद्र वाघाडे,  राजेश येल्ले, रामलाल सोनवाने, भारत मौजे,   मारोती उके, रोहित उके, तेजराम मौजे, सुधीर मेश्राम,  छगन मेश्राम, विलास सोनवाने, शिवराम वाघाडे, छबीलाल वाघाडे, मोतनलाल मेश्राम याचा समावेश आहे.
या प्रवेशामुळे पक्ष संघटन अधिक बळकट होवून आगामी निवडणुकांमध्ये याचा निश्चित फायदा होणार, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. यावेळी आयोजित छोटेखानी कार्यक्रमात माजी आमदार राजेंद्र जैन, खरेदी विक्री उपाध्यक्ष  रामूभाऊ हरिणखेडे, शहर अध्यक्ष कृष्णकुमार बिसेन, युवक शहर अध्यक्ष प्रमोद जैन, शहर प्रवक्ता मनीष धमगाये सहित अन्य उपस्थित होते.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *