LatestNewsगोंदियाविदर्भ

Election result : गोंदिया, गोरेगाव, सालेकसात काँग्रेसचा तर तिरोड्यात भाजपचा नगराध्यक्ष

गोंदिया : जिल्हातील गोंदिया तिरोडा नगर परिषद आणि गोरेगाव आणि सालेकसा नगर पंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल मतमोजणीनंतर Election result जाहीर झाला. गोंदिया नगर परिषदेत भाजप व काँग्रेसमध्ये सत्ता संघर्ष होणार असून तिरोडा नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसने तर सालेकसा आणि गोरेगाव नगर पंचायतींमध्ये काँग्रेसने झेंडा रोवला आहे. सालेकसा व गोरेगाव नगर पंचायतींवर काँग्रेसचा तर गोंदिया नगर परिषदेत काँग्रेसचा व तिरोडा नगर परिषदेत भाजपचा नगराध्यक्ष निवडून आला.

जिल्ह्यातील गोंदिया नगरपरिषदेकरीता झालेल्या निवडणुकीची मतमोजणी जाहीर झाली असून भाजपचे विद्यमान आमदार विनोद अग्रवाल यांना धक्का देत नगरपरिषदेतील भाजपच्या हातून नगराध्यक्षपद हिसकावत काँग्रेसचे सचिन गोविंद शेंडे हे विजयी झाले. माजी आमदार गोपालदास अग्रवाल व युवा नेते प्रफुल अग्रवाल यांनी केलेले नियोजन आणि भाजपने उमेदवारी देतांना केलेले हुकुमशाही अंगलट आल्याचे नगरपरिषदेच्या निकालावरुन स्पष्ट झाले आहे. Election result महाविकास आघाडीने १७ जागा जिंकल्या असून ३ अपक्ष विजयी झाले आहेत. भाजपला १८ तर राष्ट्रवादीला ५ जागावर विजय मिळविता आला.या निवडणुकीत मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेलांना चांगलाच धक्का बसला आहे.त्यांनी ही निवडणुक माझी नव्हे अशी घेतलेली भूमिका व राष्ट्रवादीच्या बंडखोरांना निलबिंत करण्याएैवजी गप्प राहत दिलेला छुपा पाठिंबा राष्ट्रवादीच्या पराभवाला कारणीभूत ठरला आहे. याउलट शिवसेना(उबाठा) व बसपने आपले अस्तित्व टिकवून ठेवल्याचे निकालात स्पष्ट झाले.विधानसभा निवडणुकानंतर झालेल्या या निवडणुकीत गोंदियात भाजप आमदारांना चांगलाच धक्का दिला.अपक्ष निवडून आलेल्या ३ नगरसेवकांत भाजप,काँग्रेस व राष्ट्रवादीच्या बंडखोरांचा समावेश आहे.

Election result गोंदिया नगरपरिषदेच्या निवडणुकीची आज झालेल्या मतमोजणीत भारतीय जनता पक्षाकडून सत्ता हिरावून घेत काँग्रेसने नगराध्यक्षपद विजयश्री खेचून घेतले.काँग्रेसचे सचिन गोविंद शेंडे यांनी भाजपचे कशिश जायस्वाल यांचा पराभव केला.तिसर्या क्रमांकावर शिवसेना शिंदे गटाचे डाॅ.प्रशांत कटरे तर चौथ्या क्रमांकावर राष्ट्रवादीच्या माधुरी नासरे राहिल्या.शिवसेनेकडून रिंगणात राहिलेले डाॅ.प्रशांत कटरे यांनी भाजपकडे उमेदवारी मागितली,परंतु भाजपच्या गोंदिया व नागपूरच्या नेत्यांनी त्यांची प्रत्येकवेळी निवडणुक आली की उमेदवारी मागतात असे म्हणून खिल्ली उडवली होती.नागपूरच्या एका भाजप नेत्याने तर चक्क सभेत त्यांच्याबद्दल बोलले होते.त्यानंतर कटरे यांनी शिवसेनेकडून रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला,त्यावेळीही ३ हजाराच्या आत ते मते घेतील आम्हाला काहीच फरक पडणार नाही अशी वल्गना करुन मुख्यमंत्र्याचीही दिशाभूल केली गेली आणि भाजपला भाजपच्या अतिगर्व झालेल्या नेत्यांमुळे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव स्विकारावा लागल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले आहे. Election result भाजपच्या विजयाचा घास शिवसेनेचे उमेदवार डाॅ.प्रशांत कटरेंनी हिरावून घेतल्याने काँग्रेसला नगराध्यक्ष पदावर विजय मिळविता आला.तर भाजप राष्ट्रवादीच्या बंडखोरांनी विजय मिळविला.४४ नगरसेवकामध्ये भाजप – १८, काँग्रेस -१४, एनसीपी-५, बीएसपी-२, शिवसेना (उबाठा)-२ व ३ अपक्ष नगरसेवक निवडून आले आहेत.

पतीपत्नी पोचले पालिके,नगराध्यक्षपदी पती विजयी मात्र पत्नीचा पराभव

विशेष म्हणजे नगराध्यक्ष पदी विजयी झालेले काँग्रेसचे सचिन शेंडे यांच्या पत्नी विशाखा शेंडे या नगरसेविकेच्या निवडणुकीत पराभूत झाल्या आहेत. काँग्रेसच्यावतीने राकेश ठाकुर व शिलु राकेश ठाकुर हे पती पत्नी दोन वेगवेगळ्या प्रभागातून विजयी झाले.तर बसपने आपली उपस्थितीत यावेळेसही कायम ठेवली आहे.तर शिवसेना(उबाठा)जिल्हाध्यक्ष पकंज यादव विजयी झाले तर त्यांच्या पत्नी ललिता यादव यांचा पराभव झाला.

मात्तबर नेत्यांचा पराभव : Election result गोंदिया नगरपरिषदेच्या निवडणुकीत मातब्बर नेत्यांना पराभव स्विकारावा लागला आहे.रात्रदिवंस आपल्या प्रभागात काम करणारे भाजपचे घनश्याम पानतवणे,राजकुमार कुथे,माजी नगरसेविका भावना कदम,काँग्रेसचे राजु पारधी,शकिल मंसुरी यांच्यासारख्यांना पराभवाचा स्वाद चाखावा लागला आहे.

गोंदिया नगर परिषद नगराध्यक्षपद उमेदवारांना मिळालेली मते

१) शिंदेसेना: डॉ. प्रशांत कटरे -११८८७

२) भाजप: कशिश जयस्वाल- २४५५२

३) काँग्रेस : सचिन शेंडे    – २७८००

४)  राष्ट्रवादी काँग्रेस : डॉ. माधुरी नासरे – ८२०७

५) आम आदमी पार्टी: उमेश दमाहे  – ९००

६) बहुजन समाज पार्टी ःडाॅ.अजय पडोळे -३३००

……………….

तिरोड्यात भाजपने नगराध्यक्षपदाचा गड राखला

तिरोडा :  स्थानिक नगर परिषद निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले Election result असून नगराध्यक्ष पदी भाजपाचे अशोक असाटी हे 2761 मतांनी विजयी झाले.त्यांनी नगरपरिषदेतील नगराध्यक्षपद भाजपकडे विजय प्राप्त करुन टिकवून ठेवले.मात्र नगरसेवकांच्या संख्येत गेल्यावेळसारखीच स्थिती भाजपची दिसून आले.20 नगरसेवकापैकी 12 नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तर 06 नगरसेवक भाजप,01 शिवसेना(उबाठा), 01 काँग्रेसचा निवडून आला.काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिलीप बनसोड यांचा तिरोडा गृहनगर असताना त्यांना नगराध्यक्ष पदी आपल्या पक्षाचा उमेदवाराला निवडून आणता येऊ शकले नाही,त्यामुळे काँग्रेसचे राजकीय अस्तित्व संपत आल्याची चर्चा सुरु झाली आहे.

तिरोडा नगरपरिषद निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक एक ते चार मध्ये आठही नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे निवडून आले.शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना शिंदे गटाला मात्र या निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही.यावरुन दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या राजकीय भूमिकेवर प्रश्नचिन्ह लागले.या निवडणुकीत तिरोड्याचे आमदार विजय रहागंडाले यांनी नगराध्यक्षपदी भाजपच्या उमेदवाराला विजय मिळवून दिला,मात्र नगरसेवक निवडून आणण्यात कमी का पडले याचं आकलन कळेनासे झाले आहे.जिल्ह्यातील दुसर्या क्रमाकांची तिरोडा नगरपरिषद असून मागच्या निवडणुकीत येथे भाजपचे नगराध्यक्ष होते तर नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आलेले होते.

तिरोडा नगर परिषदेतील नगराध्यक्षपद उमेदवारांना मिळालेली मते

१) भाजप: अशोक असाटी -8737

२) काँग्रेस: गजेंद्र सिंगणजुडे -1227

३) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटः अजयसिंह गौर -5976

४) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष: संदीप पाटील -541

५) शिंदेसेना: वसंत नागपुरे -254

६) अपक्ष: नागेश तरारे – 243

७)अपक्ष- दिलीप लिल्हारे-७६

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *