मांडोदेवी देवस्थानात सर्वाधिक २०३५ ज्योती कलश
पूजा-अर्चनेसाठी भाविकांचा गर्दी
गोंदिया : जिल्ह्यात शारदीय नवत्ररात्र उत्सव मोठ्या उत्साह व भक्तीभावात साजरा केला जात आहे. नवरात्रनिमित्त देवी मंदिरात विविध धार्मिक अनुष्ठान आयोजित करण्यात आले असून प्रसिध्द मॉ मांडोदवी देवस्थानात २०२५ ज्योति कलश प्रज्वलित करून भक्तीभावात पुजा-अर्चना केली जात आहे. दर्शन घेण्यासाठी भाविकही मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असून मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले आहे.
नवरात्र हा एक पावन उत्सव मानला जातो. हा उत्सव देवी-पूजनाबरोबरच शक्ती साधना आणि आत्मिक शुद्धीसाठी साजरा केला जातो. नवरात्र वर्षातून चार वेळा येते – चैत्र, आषाढ, आश्विन (शारदीय) आणि माघ. यांपैकी शारदीय नवरात्र विशेष मानाचे मानले जाते कारण हा उत्सव देवी दुर्गेच्या उपासनेचा महान महोत्सव म्हणून साजरा केला जातो. याच नवरात्रात गोंदिया जिल्ह्यातील सुप्रसिद्ध माँ मांडोदेवी देवस्थान तेढा/बघेडा येथे माँचा दरबार सजला असून, दररोज हजारो भक्त माता राणीच्या उपासनेसाठी हजेरी लावत आहेत.मांडोदेवी देवस्थानाचे अध्यक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी सांगितले की, यावर्षी नवरात्र महोत्सवाच्या दरम्यान आपल्या मनोकामनांसाठी महिलांनी सर्वाधिक २०३५ घटांची स्थापना केली आहे. घट-कलशाची देखभाल करण्यासाठी विशेष समिती नियुक्त करण्यात आली आहे. माँ मांडोदेवी सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते, त्यामुळे येथे येणार्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

