LatestNewsगोंदियामहाराष्ट्रविदर्भ

घागर मोर्चाने गाजली पंचायत समितीची आमसभा

अर्जुनी मोरगाव: पंचायत समिती अर्जुनी मोरगाव ची वार्षिक आमसभा व सरपंच संमेलन आमदार इंजिनियर राजकुमार बडोले यांचे अध्यक्षतेखाली स्थानिक प्रसन्न सभागृहात दिनांक 8 ऑगस्टला संपन्न झाली या सभेत तालुक्यातील ग्रामीण भागातील विविध समस्या रखडलेले प्रकल्प शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी तसेच नागरिकांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण चर्चा व निर्णय घेण्यात आले सोबतच रस्त्यांची अडचण घरकुल योजना अंतर्गत लाभार्थ्यांची समस्या पाणीटंचाई जिल्हा परिषद शाळांची दुरावस्था प्रादेशिक पाणीपुरवठा योजना जिल्हा वार्षिक योजनेतील निधी मागणी धरणातील गाढ व इतर अनेक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत गाडगेबाबा तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले याप्रसंगी तत्कालीन माजी कन्या भाग्यश्री योजना अंतर्गत लाभार्थ्यांचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले प्रास्ताविक करताना पंचायत समिती गटविकास अधिकारी पल्लवी वाडेकर यांनी विविध विकास कामांवर प्रकाश टाकला त्यानंतर शिक्षण विभागाचा आढावा गटशिक्षण अधिकारी यांनी सादर केला अनेक विभागांचा आढावा सुरू असतानाच अचानक वडेगाव स्टेशन येथील सरपंच श्रीकांत होणारे हे आपल्या गावातील महिलांसोबत घागर मोर्चा घेऊन घोषणा देत प्रसन्न सभागृह दणाणून सोडला गेल्या अनेक वर्षांपासून पाणीपुरवठा विभागाच्या वतीने योग्य असा पाणीपुरवठा गावात होत नसल्याने महिलांनी घागर मोर्चा सभास्थळी आणून सभागृहाचे लक्ष वेधून घेतले तालुक्यात जलजीवन मिशनची कामे मोठ्या प्रमाणात सुरू असली तरी निधी अभावी सदर कामे बंद अवस्थेत असल्याची माहिती देण्यात आली जलजीवन मिशन म्हणजे पांढरा हत्ती अशी प्रतिक्रिया सर्वत्र उमटत होतेतसेच गटशिक्षण अधिकाऱ्याने लाच मागितल्याचे व्हिडिओ प्रसार माध्यमातून प्रसारित होत असल्याने या अधिकाऱ्याची चौकशीची मागणी सुद्धा करण्यात आली तसेच मग्रारोहयो मध्ये कामे करणारी यंत्रणा ग्रामपंचायत जरी असली तरी सर्वत्र ठेकेदारांची मक्तेदारी त्यातून झालेले निकृष्ट काम यावर सरपंच उपसरपंच यांनी उपस्थित करून सभा गाजवली या आमसभेस जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर पंचायत समिती सभापती आम्रपाली डोंगरवार उपसभापती संदीप कापगते जिल्हा परिषद सदस्य यशवंत गणवीर रचनाताई गहाणे जयश्रीताई देशमुख श्रीकांत घाटबांधे कविता कापगते सरपंच संघटनेचे अध्यक्ष भोजराज लोगडे गटविकास अधिकारी पल्लवी वाडेकर सहगट विकास अधिकारी राणेर साहेब तसेच पंचायत समिती सदस्य होमराज पुस्तोडे नूतनलाल सोनवणे डॉक्टर नाजूक कुमरे घनश्याम धामट फुलचंद बागडेरिया प्रमोद लांडगे सविताताई कोडापे पुष्प लताताई दुरुगुकर चंद्रकलाताई ठवरे कुंदाताई लोगडे शालिनीताई डोंगरवार भाग्यश्रीताई सयाम तसेच तालुक्यातील पत्रकार जनप्रतिनिधी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत सभेत अध्यक्ष इंजिनिअर राजकुमार बडोले यांनी सर्व विभागांना तत्परतेने काम करण्याचे निर्देश दिले आहे तरीसुद्धा या आमसभेमुळे तालुक्यातील प्रश्न मार्गी लागतील काय असा प्रश्न उपस्थितांकडून चर्चिला जात होता.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *