LatestNewsगोंदिया

OBC reservation: ओबीसींचा सरकारला ‘इशारा’जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याला विरोध

गोंदिया : ओबीसी प्रवर्गातून OBC reservation मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संभाव्य निर्णयाचा तीव्र विरोध करीत जिल्ह्यातील आेबीसी संघटनांनी बुधवारी (ता. ३) सकाळी ११ ते दुपारी तीन वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘सरकारला इशारा’ आंदोलन केले. यावेळी शेकडोंच्या संख्येने एकवटलेल्या समाजबांधवांनी शासनाच्या २ सप्टेंबरच्या परिपत्रकाचीही होळी केली.

महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाची OBC reservation संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने २ सप्टेंबर रोजी काढलेला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा शासन निर्णय रद्द करावा, हैद्राबाद गॅझेटिअरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी किंवा मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबत काढलेला हा निर्णय ओबीसी समाजावर अन्याय करणार आहे. पुन्हा सरकारने सगेसोयरेंच्या माध्यमातून ओबीसींच्या आरक्षणाला OBC reservation धक्का लावण्याचे काम केले आहे. असा आरोप करीत आेबीसी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली.सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत कोणताही निर्णय घेतल्यास त्याचा थेट परिणाम ओबीसी समाजावर होणार आहे. त्यामुळे आम्ही कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला असंविधानिक पद्धतीने ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्याच्या विरोधात आहोत, याची सरकारने काळजी घेत सदर निर्णय मागे घ्यावा, असा मागणीवजा इशारा आेबीसी संघटनांनी या आंदोलनातून दिला आहे. त्यानंतर आंदोलकांनी शासनाने काढलेल्या २ सष्टेंबरच्या परिपत्रकाची होळी केली.

आंदोलनात खेमेंद्र कटरे, अशोक लंजे, गंगाधर परशुरामकर, अमर वराडे, सुरेश हर्षे, संजय टेंभरे, कैलाश भेलावे, टिकाराम भेंडारकर, गोवर्धन बोपचे, भूमेश शेंडे, मनोज हरीणखेडे, पृथ्वीराज चव्हाण, प्रमोद गुडधे, नरेश परिहार,अजाबराव रिनायत, सी.पी. बिसेन, दिनेश हुकरे, राजकुमार लाडसे, देवानंद कुकडे, प्रकाश काशिवार, तुळशिदास शिवणकर, महेंद्र बिसेन, रमेश मेंढे, गिरीधारी हत्तीमारे, लोकचंद कापगते, मोहन भेंडारकर, धमेंद्र डोहरे, प्रभाकर दोनोडे, सुनील पटले, मोहसीन खान, चंद्रकुमार बहेकार, ओमप्रकाश लांजेवार, रवींद्र तुरकर, मुनेश्वर कुकडे, नरेश चौधरी, सविता बेदरकर, गौरव बिसने, माधोराव तरोणे, दुर्गाप्रसाद ठाकरे, देवचंद बिसेन, मनोज डोये, किशोर कोरे, कमल हटवार, हेमंत बिसेन, राकेश पाटील, अश्विनी पटले, अरुण पारधी, गुड्डू लिल्हारे, मनोज मेंढे, पुष्पा खोटेले, गायत्री इरले, बंटी पंचबुद्धे, भूमेश मेंढे, सुनील भोंगाडे, रवी भांडारकर, ऋषिकांत साहू, धनलाल ठाकरे, कमल हटवार, तिरथ येटरे, भागचंद रहागंडाले राजु ब्राम्हणकर बालू वंजारी, गिरधारी हत्तीमारे, लोकचंद कापगते, प्रकाश काशीवार यांच्यासह सकल आेबीसी समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आंदोलकांच्या या आहेत मागण्या

शासनाने तत्काळ जातीनिहाय जनगणना करावी, ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवून लोकसंख्येच्या प्रमाणात सर्वांना आरक्षण द्यावे, शासनाने मराठा आंदोलकांच्या दबावाखाली कोणताही निर्णय घेऊ नये आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाचे रक्षण करावे, २ सप्टेंबर रोजी काढलेला शासन निर्णय रद्द करण्यात यावा. बाॅक्सअन्यथा तीव्र आंदोलनशासनाने आेबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यास याला विरोध म्हणून तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा आेबीसी अधिकार मंचचे संयोजक खेमेंद्र कटरे व पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *