LatestNewsगोंदिया

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीस सज्ज व्हा : माजी आमदार चंद्रिकापुरे

शिवसेना पक्षाची आढावा बैठक
अर्जुनी मोरगाव :
गाव तिथे शिवसेनेची स्थापना करा. पक्षप्रमुख राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आपल्या निवडून लढण्यासाठी शिवसैनिकांनी तत्पर असले पाहिजे. त्याकरिता स्वतः सर्व सर्कल पिंजून काढीत पक्ष मजबूत करण्यासाठी सज्ज व्हावे. एक-एक शाखा प्रमुख, प्रभाग प्रमुख आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे पक्षातील सर्व मतभेद बाजूला ठेवून आपण पक्ष बांधण्यासाठी काम करावे, असे प्रतिपादन माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनुषंगाने ३० ऑगस्ट शनिवार रोजी शिवसेना शिंदे गट अर्जुनी मोरगाव शहरातील नगर पंचायत सभागृहात आढावा बैठक झाली. या बैठकीला मार्गदर्शन करताना माजी आमदार तथा शिवसेना नागपुर लोकसभा संपर्कप्रमुख मनोहर चंद्रिकापुरे बोलत होते.
सभेला संजय ईश्वर, यशवंत शहारे, प्रमोद डोंगरे, देवा डोंगरवार, भूषण शेंडे, आशिष लंजे, कुंडलिक लोणारे, मन्साराम डोंगरवार, राजकुमार शहारे, मायाताई, राधेश्याम भैसारे, संदीप लाडे, बुद्धविजय धाकडे,फाल्गुन नखाते, वीरेंद्र ठाकरे, अनिल घरडे, तुषार लोडगे, शुभम नेवारे, सौरभ पेटकर, निशाताई मस्के, साविताई भलावी, रीनाताई सांगोळे, पुष्पा जांभुळकर, उज्वलाताई शैलेश खोब्रागडे, आरती मेश्राम, सुगंधाताई शहारे, रंजनाताई शहारे, दुर्गाताई दुर्योधन शहारे, सुजाताई प्रशांत खोब्रागडे, अश्विनी विवेक खोब्रागडे, शीलाताई ज्ञानेश्वर प्रधान, ज्योती रामटेके, भास्कर लांजेवार, आत्माराम वाडगुरे, नरहरी जांभूळकर, अनिकेत भलावी, तसेच शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील व नगर पंचायत भागातील संपूर्ण माहिती देऊन सर्कलनिहाय जिल्हा परिषद व नगर पंचायत हद्दीतील वॉर्डनिहाय शिवसेना पदाधिकार्‍यांच्या नियुत्तäया २५ दिवसांत करण्यात येतील, तसेच जि.प., पं.स.सर्कल प्रमुख व अर्जुनी मोरगाव शहरातील पदाधिकारी यांनी निवडणुकीआधी पक्ष बांधणी करायची आहे. यासाठी सज्ज राहण्याच्या सुचनाही पदाधिकारी व कार्यकर्त्यांना माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी दिल्यात.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *