Zp School : जि.प.अध्यक्षांनी घेतला विद्यार्थ्यांचा क्लास
जि.प.शाळांचा दर्जा व गुणवत्ता सुधारण्यावर भर:- लायकराम भेंडारकर
अर्जुनी-मोर. : प्राथमिक शिक्षण हाच विद्यार्थ्यांचा पाया आहे. आदिवासी दुर्गम आणी ग्रामीण भागात असलेल्या जि.प.प्राथमिक शाळा ह्या गोरगरीब लोकांच्या विद्येचे मंदीर आहेत. त्यासाठी जि.प.शाळांचे अस्तित्व टिकुन राहावे यासाठी प्रत्येकाचे कर्तव्य असले पाहीजे.सध्या जि.प.शाळांमधे गुणवत्तापूर्ण शिक्षक कार्यरत आहेत. दिवसेंदिवस पटसंख्या वाढविणावर भर दिसत आहे. आपण नेहमीच जि.प.शाळांचा स्तर उंचावण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहोत. असे उदगार गोंदिया जि.प.चे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी काढले आहे.
अर्जुनी-मोर. तालुक्यातील अरततोंडी / दाभणा येथील जि.प.प्राथमिक शाळेला भेट दिली असता ता.21 लायकराम भेंडारकर बोलत होते. यावेळी अरततोंडी येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेला भेट देऊन शाळेतील शिक्षणाची गुणवत्ता, इमारतीची स्थिती, तसेच विविध शैक्षणिक सुविधा व योजनांची अंमलबजावणी यांचा आढावा घेतला. तसेच शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळेचा ताळेबंद, विद्यार्थी संख्या, शिक्षकांची उपलब्धता, शैक्षणिक प्रगती, तसेच शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी याबाबत सविस्तर माहिती दिली. दरम्यान विविध वर्गांना भेट दिली, विद्यार्थ्यांशी संवाद साधला व त्यांना शैक्षणिक प्रश्न विचारली ज्याची विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे उत्तरे दिली.तसेच प्रत्येक वर्गात जावुन विद्यार्थ्यांचा क्लाससुध्दा घेतला. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष लोकेश तरोणे, सरपंच प्रदीप कांबळे, ग्रामसेवक परमारजी,शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षिका, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते.-

