LatestNewsगोंदिया- भंडारा

bhartiya communist party; भाकप भंडारा जिल्हा कौन्सिल सभा ; विविध निर्णय

कॉम्रेड सुधाकर रेड्डी यांना आदरांजली
भंडारा :
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या भंडारा जिल्हा कौन्सिलची सभा दिनांक 24 ऑगस्ट 2025 ला राणाभवन भंडारा येथे कॉम्रेड गजानन पाचे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
सर्वप्रथम भाकपचे दिवंगत माजी राष्ट्रीय महासचिव व दोन वेळचे खासदार कॉम्रेड सुधाकर रेड्डी आंध्र प्रदेश यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड हिवराज उके यांनी मागील सभेचा आढावा, जिल्हा व राज्य अधिवेशनाचे तसेच जिल्ह्यातील पक्षाचे नेतृत्वात झालेल्या जनांदोलनाचा आढावा सादर केला. तर पक्षाचे राष्ट्रीय कौन्सिल सदस्य कॉम्रेड शिवकुमार गणवीर यांनी मुंबई येथे झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या सभेत झालेल्या निर्णयाची तसेच राज्य व राष्ट्रीय राजकारणाची माहिती दिली. तर कॉम्रेड माधवराव बांते यांची राष्ट्रीय महाधिवेशनासाठी प्रतिनिधी निवड झाल्याची माहिती ही दिली.
या सभेत विविध निर्णय घेण्यात आले त्यात प्रामुख्याने 1) 10 सप्टेंबर 2025 ला छत्रपती शिवाजी महाराज किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधान व लोकशाही विरोधी जन सुरक्षा कायद्याच्या विरोधात धरणे आंदोलन करणे, 2) एक ते पंधरा सप्टेंबर पर्यंत जिल्ह्यात तालुका स्तरावर पक्षाचे मुखपत्र युगांतर, मुक्तिसंघर्ष, न्यूज जे या पेपरचे जाहीररित्या वार्षिक वर्गणीदार नोंदवणे, 3) कॉम्रेड हिवराज उके यांच्यासह भंडारा व इतर नगर परिषदेच्या निवडणुका लढवणे, 4) पक्षाच्या शताब्दी वर्षानिमित्त पक्ष निधी गोळा करणे, 5) वरील व इतर सर्व निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी तात्काळ तालुका कौन्सिलच्या बैठका घेण्याचे ठरले, त्यात मोहाडी 7 सप्टेंबर, भंडारा 8 सप्टेंबर, साकोली 8 सप्टेंबर, लाखनी 9 सप्टेंबर व तुमसर (राजापूर) येथे 12 सप्टेंबर चा समावेश आहे.
सभेला प्रामुख्याने कॉम्रेड शिवकुमार गणवीर, कॉम्रेड माधवराव बांते, कॉम्रेड हिवराज उके, शैलेंद्र गणवीर, गजानन पाचे, चेतन राऊत, पंकज माने, नितीन कुमार वासनिक, राजू बडोले, गीता मेश्राम, ताराचंद देशमुख, जागेश्वर साखरे, किशोर बारस्कर, गजानन कठाणे, सुनील कोहळे, सुनंदा रामटेके, वनिता नंदेश्वर, ग्यानीराम नेवारे, आहे गजानन लाडसे इत्यादींची उपस्थिती होती.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *