लोहारा तलावाची पाळ फुटली; तिडका येथील दोनशे एकड शेतीला सिंचनाचा प्रश्न
अर्जुनी मोरगाव : तालुक्यातील तिडका/ करड परिसरातील लोहारा तलावाची पाळ 21 ऑगस्ट रोजी फुटल्याने ऐन पावसाळ्यात तलाव खाली झाल्याने सदर तलावावर अवलंबुन असलेल्या अंदाजे दोनसे एकड शेतजमिनीला सिंचनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.तलावाची पाळ फुटल्याची माहीती संबधीत शेतक-यांसह गावचे पोलीस पाटील प्रशांत पुस्तोळे यांनी संबधीत अधिकारी यांना दिली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सध्या अर्जुनी-मोर. तालुक्यात समाधानकारक पाऊस पडत आहे.ईटियाडोह धरणांसह सर्वच तलाव बोड्या ओव्हरफ्लो झालेल्या आहेत.तालुक्यात मामा तलावाव्यतीरीक्त जि.प.व लघुपाटबंधारे विभागाचे शेकडो तलाव आहेत.तालुक्यातील अनेक तलाव अतीक्रमन धारकांनी गिळंकृत केल्याने तलावांची आराजीच कमी करुन टाकल्याने सिंचनक्षमता कमी झाली आहे. अशातच अनेक तलावाच्या पाळ जिर्ण झाल्याने दरवर्षीच तालुक्यात एक ना एक तलावाची पाळ फुटते.अशातच 21 ऑगष्ट ला तिडका/करड येथील लोहारा तलावाची पाळ फुटली.त्यामुळे या तलावावर निर्भर असलेल्या अंदाजे दोनशे एकड शेतजमिनीचा सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.सदर तलाव लघु पाटबंधारे उपविभाग अर्जुनी-मोर. यांचे देखरेखेखाली येत असल्याची माहीती आहे.

