Attack: थरारक वाद विकोपाला; पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला करून पतीची आत्महत्या
बोरनार येथील घटना : पत्नीची प्रकृती चिंताजनक
जळगाव : तालुक्यातील बोरनार येथे पती-पत्नीच्या वादात राग उफाळून आला. यात संतप्त झालेल्या पतीने पत्नीवर कुन्हाडीने जीवघेणा हल्ला करून त्यानतर स्वतः धावत्या रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केल्याची घटना १९ रोजी सकाळी ७वाजेच्या सुमारास घडली.
आनदा उर्फ छोटू महारु थामोळे (धनगर, वय ४५) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. पत्नी, २ मुलासह ते राहत होते. शेतीकाम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. त्याचा मोठा मुलगा विनोद याने आयटीआयचे शिक्षण घेतले आहे. तर लहान मुलगा पप्पु हा दहावीत शिकत आहे. त्याच्यासह घरात आनंदा धामोळे याच्या आई या देखील राहतात. मात्र, त्या दोन दिवसापासून जळगाव येथे आपल्या मुलीकडे आल्या होत्या. त्यामुळे घरात थामोळे दांम्पत्य व दोन्ही मुलेच होती. त्यांची पत्नी रेखा धामोळे (वय ४१) यांच्यासोबत १९ रोजी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास पती आनंद याचा किरकोळ वाद झाला. या वादातून संतापलेल्या आनद थामोळे यानी रागाच्या भरात पत्नी रेखा याच्या डोक्यावर, हातावर कुन्हाडीने जबर वार केले.
या हल्ल्यात रेखा धामोळे गभीर जखमी झाल्या. पत्नीचा मृत्यू झाला असे समजून. छोटू थामोळे यानी सकाळी ६ वाजता घराबाहेर पडून म्हसावद रेल्वेचे गेटजवळ रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रेखा थामोळे याना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्याना पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले असून त्याची प्रकृती अद्यापही गभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेच्या वेळी थामोळे यांची दोन्ही मुले, विनोद (वय १९) आणि पप्पू (वय १५) हे खालच्या घरात झोपलेली होती.

