Youth committed suicide: तरुणाची वैनगंगेत उडी घेऊन आत्महत्या
ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनामुळे संपविले जीवन
गोंदिया : (Youth committed suicide) : ऑनलाईन गेमिंगने अनेक तरुणांना भुरळ पाडली असून यात अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झालेले आहे. तर या व्यसनामुळे अनेकांनी टोकाचे पाऊल उचलत जीवन संपविल्याचे प्रकार उघडकीस येत असताना असाच प्रकार दि.१७ ऑगस्ट रोजी उघडकीस आला आहे. कारधा वैनगंगा नदीमधील दिपान बेटाजवळ (Youth committed suicide) एका तरुणाचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.कारधा वैनगंगा नदीमधील दिपान बेटाजवळ आढळले प्रेतकारधा वैनगंगा नदीमधील दिपान बेटाजवळ आढळले प्रेतपोलिसांच्या तपासात धक्कादायक बाब पुढे आली आहे. मृतक गोंदिया तालुक्यातील असून (Youth committed suicide) ऑनलाईनच्या गेमिंगच्या व्यसनामुळे १४ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाने माडगी वैनगंगा नदीपुलावरून उडी घेऊन आत्महत्या केली. वंश डिलेश ठाकरे (२१) रा. नगंपुरा/मुर्री ता.जि.गोंदिया असे मृतकाचे नाव आहे.मृतक हा दि.४ ऑगस्ट रोजी मोटारसायकलने गोंदियातील लायब्ररीत गेला होता. सायंकाळ होऊनही मृतक घरी परतला नसल्याने त्याच्या कुटुंंबियांनी वंश याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्याची मोटारसायकल, मोबाईल, कागदपत्रे व चप्पल माडगी वैनगंगा पुलावर आढळून आल्याने त्याच्या आत्महत्येची शंका अधिकच बळावली. याबाबत त्याच्या कुटुंबियांनी गोंदिया पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली.अखेर १४ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या (Youth committed suicide) तरुणाचा मृतदेह कारधा शिवारात दिपान बेटाजवळ वैनगंगा नदीपात्रात कुजलेल्या स्थितीत आढळून आले. माहिती मिळताच कारधा ठाण्यातील पो.उपनि प्रशांत साखरे, पो.हवा. पुरुषोत्तम थेर, पोशि किरण नवघरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. घटनेची नोंद कारधा पोलिसात केली असून पुढील तपास ठाणेदार गोकुल सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात कारधा पोलीस करीत आहेत.

