Mahavitaran : महावितरणच्या भंडारा शहर उपकेंद्राला ‘आयएसओ’ मानांकन
भंडारा : ग्राहकांना अखंडित आणि दर्जेदार वीजपुरवठा देण्याच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. महावितरणच्या गोंदिया परिमंडळांतर्गत असलेल्या भंडारा शहर (टाकळी) येथील 33/11 के.व्ही. उपकेंद्राला एकाच वेळी चार प्रतिष्ठित ‘आयएसओ’ मानांकन मिळाले आहे. या उपकेंद्राला आयएसओ 9001:2015 (गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली), आयएसओ 14001:2015 (पर्यावरण व्यवस्थापन प्रणाली), आयएसओ 50001:2018 (ऊर्जा व्यवस्थापन प्रणाली) आणि आयएसओ 45001:2018 (व्यावसायिक आरोग्य आणि सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली) अशी चार मानांकने मिळाली आहेत. या मानांकनामुळे भंडारा शहर उपकेंद्र केवळ जिल्ह्यातीलच नव्हे, तर गोंदिया परिमंडळातील दुसरे ‘आयएसओ’ मानांकित उपकेंद्र ठरले आहे. यापूर्वी, भंडारा विभागातील आय.पी.डी.एस. उपकेंद्राला आयएसओ 9001:2015 मानांकन मिळाले होते.
महावितरणचे ‘इज ऑफ लिव्हिंग’ हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून, उपकेंद्राचे आधुनिकीकरण करण्यात आले. या दर्जेदार कामामुळे ग्राहकांना अधिक चांगली सेवा देणे शक्य होणार आहे.भंडारा विभागाचे कार्यकारी अभियंता डॉ. गजानन जैस्वाल यांच्या नेतृत्वाखालील अतिरिक्त कार्यकारी अभियंता नुनदेव भुसारी, राम पराडकर, सहायक अभियंता जगदीश मते, अभय बन्सोड, दृष्यंत खोब्रागडे, रोहन कऱ्हाडे, तसेच यंत्रचालक अमर खराबे, गोपाल माकडे, देवचंद पिल्लेवान, नंदकिशोर झाडे आणि इतर कर्मचाऱ्यांनी केलेल्या अथक परिश्रमामुळेच हे यश मिळाले. गोंदिया परिमंडळाचे मुख्य अभियंता सुहास रंगारी आणि भंडारा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे मानांकन मिळवण्याचे ध्येय पूर्ण झाले. स्वातंत्र्य दिनी, या मानांकन प्रमाणपत्रांचे अनावरण करण्यात आले. यावेळी कार्यकारी अभियंता प्रशासन गोंदिया परिमंडल, राजीव रामटेके, उपकार्यकारी अभियंता, सुनील गिऱ्हिपुंजे, घनशाम जांगडे यांच्यासह भंडारा विभागातील अधिकारी व कर्मचारी आवर्जुन उपस्थित होते.
………………………..
100 दिवसाच्या कार्यालयात सुधारणा विशेष मोहीमेतन भंडारा शहर उपविभाग तृतीय
100 दिवसाच्या कार्यालयात सुधारणा विशेष मोहीमेत महाराष्ट्र शासना तर्फे भंडारा विभागातील भंडारा शहर उपविभागाची तृतीय क्रमांकाने निवड झाली आहे. भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजयजी सावकारे यांच्या हस्ते स्वातंत्र दिनानिमित्त झालेल्या विशेस कार्यक्रमात महावितरणच्या भंडारा शहर उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता राम पराडकर महावितरण यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

