LatestNewsगोंदियाविदर्भ

Itiyadoh Dam : इटियाडोह धरण हाऊसफुल्ल; पाण्याचा विसर्ग सुरू

अर्जुनी मोरगाव: तालुक्यातील गोठणगाव येथील इटियाडोह धरण १६ ऑगस्ट रोजी १०० टक्के भरले आहे. धरण ओव्हरफ्लो झाल्याने १७ ऑगस्ट रोजी धरणाच्या सांडव्यावरुन (६ इंच) अर्धा फुट इतका पाण्याचा विसर्ग सुरु आहे. यामुळे गाढवी नदीच्या काठावरील गावांना तसेच नदीपात्रातुन आवागमन करणाऱ्या सर्व सबंधितांनी सतर्कतेचा ईशारा प्रशासनाने दिला आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यात सतत पाऊस हजेरी लावत असल्याने इटियाडोह धरणाच्या जलसाठ्यात झपाट्याने वाढझाली होती. त्यामुळे धरण ओव्हरफ्लो होण्याकडे लक्ष लागले होते. दरम्यान धरण पाहण्यासाठी पर्यटकांकडूनही गर्दी केली जात होती. अशात १६ ऑगस्ट रोजी धरण १०० टक्के भरला. धरण ओव्हरफ्लो झाल्याने १७ ऑगस्ट रोजी धरणाच्या सांडव्यावरुन (६ इंच) अर्धा फुट इतका पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे गाढवी नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याचा अंदाज आहे. पुरनियंत्रण कक्ष धरण इटियाडोह प्रशासनाच्या नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *