Congress party protest: बैलबंडी घेऊन काँग्रेसची तहसीलवर धडक
प्रलंबित मागण्यांना घेवून मोर्चा
सडक अर्जुनी –निवडणुकीच्या काळात महायुतीतील नेत्यांना मोठमोठी आश्वासने दिवेलून रस्ता काबिज केली मात्र आता शासनाला दिलेल्या आश्वासनाचा विसर पडला आहे. परिणामी शेतकरी, शेतमजुर व सर्वसामान्य नागरिक आजघडीला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. बळीराज्याचे समस्या अद्यापही मार्गी लागल्या नाही. त्याच प्रमाणे तालुक्यातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. तेव्हा शासनाने दिलेल्या आश्वासनाच पुर्तता करावी, या मागणीला घेवून आज ११ ऑगस्ट रोजी ताकुला काँग्रेस पक्षाच्या वतीने बैलबंडी मोर्चा काढण्यात आला. तसेच मागण्यांचे निवेदन तहसीलादर इंद्रायणी गोमासे यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.तालुक्याती प्रलंबित प्रश्नांना सोडविण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज बैलबंडी मोर्चा काढण्यात आला. दरम्यान तहसील कार्यालय परिसरात मोच्र्याचे सभेत रुपांतर झाले तसेच तहसीलदार यांच्या प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात चर्चा करून मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यामध्ये सुप्रीम कोर्टाने जो नुकताच वन जमिनी बाबत निर्णय दिला आहे. त्या निर्णयाची अंमलबजावणी महसूल व वनविभागाने सुरू केली आहे.ते तातडीने थांबविण्यात यावे, उन्हाळी धान पीक विक्रीचे विक्रीचे उद्दिष्ट वाढवून सरकारच्या हमीभावाने धान खरेदी करण्यात यावे. राज्य सरकारने गरीब व विविध प्रवर्गातील नागरिकांसाठी रमाई घरकुल योजना, सबरी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत, मोदी आवास योजना बंद केल्या होत्या त्यापूर्वक सुरू ठेवण्यात यावे, रोजगार हमी योजनेच्या कामाची देयके वेळेवर देण्यात यावे, धान उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने बोनस देण्यात यावे, स्मार्ट मीटर लावणे बंद करण्यात यावे, शेतीपंपाकरता १६ तास विद्युत पुरवठा करण्यात यावा, निस्तारान हक्काप्रमाणे बैलबंडी धारकांना रेती वाहून नेण्याची परवानगी देण्यात यावी, इयत्ता ११ वी च्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया बंद करण्यात यावी अशा आदी मागण्यांचा समावेश करून मागण्याचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप बंसोड, माजी जिप सदस्य तथा सरपंच गंगाधर परशुरामकर प. स. सदस्य डॉ. रुखीराम वाढई, उपसरपंच निशांत राऊत, पुष्पाताई खोटेले, मीराबाई झोहवणे, किरणलाई हटवार, नीनाताई राऊत, वंदनाताई थोटे, सुधाताई राऊत, वीरू गौर, एफ आर टी शहा, सुधाकर कुर्वे, संतोष लाडे, शिवम चांदेवार, लेखलाल टेकाम, हेमू वालदे, अशोक संयम, नागेश पटणे, रमेश भोयर, कौसल्या सोनुले, शाहिद पटेल, मोरेश्वर राजगिरे, मंगेश गहाणे, यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.

