LatestNewsगोंदियामहाराष्ट्रविदर्भ

बेरोजगारांसाठी सीसीटीव्ही कॅमेरा इन्स्टॉलेशन व सर्विसेस व्यवसायाचे मोफत प्रशिक्षण

गोंदिया : बँक ऑफ इंडिया ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था कुडवा (गोंदिया) द्वारे जिल्ह्यातील बेरोजगार युवक व युवतींना स्वयंरोजगार करण्यासाठी प्रोत्साहित करण्याकरीता विविध प्रकारचे स्वयंरोजगार प्रशिक्षण आयोजित केले जातात. सदर संस्था दि.21 जानेवारी 2011 पासून कार्यरत आहे. तसेच ही संस्था भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाद्वारे संचालित केले जाते. स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेने आजपर्यंत 9 हजार 637 ग्रामीण व्यक्तींना प्रशिक्षण दिले असून त्यापैकी 7 हजार 259 व्यक्तींनी मिळविलेल्या प्रशिक्षणाच्या आधारे स्वयंरोजगार सुरु केला आहे.

https://navchaitanyanews.com/?p=1137

बँक ऑफ इंडिया (आरसेटी) स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेद्वारे बेरोजगार 18 ते 45 वयोगटातील उमेदवारांकरीता ‘सीसीटीव्ही कॅमेरा इन्स्टॉलेशन आणि सर्विसेस’ या व्यवसायाचे 13 दिवसीय मोफत प्रशिक्षण संभाव्य दि.13 ऑगस्ट 2025 पासून सुरु होणार आहे. परंतु त्याकरीता आरसेटीला कोर्स सुरु करण्याकरीता कमीत कमी 30 ते 35 उमेदवारांची गरज असते. तसेच या संस्थेमध्ये विविध प्रकारचे कोर्स नि:शुल्क असून राहण्याची, जेवणाची नि:शुल्क सोय प्रशिक्षण संस्थेतच करण्यात येत आहे. त्याकरीता गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दारिद्रयरेषेखाली कुटुंबातील इच्छुक लोकांनी जास्तीत जास्त संख्येने व लवकरात लवकर संस्थेत येऊन आपले नाव नोंद करावेत. ग्रामीण भागातील सुशिक्षीत बेरोजगारांनी या संधीचा लाभ घ्यावा व तांत्रिक प्रशिक्षण घेऊन स्वयंरोजगार करावा. ग्रामीण भागातील बेरोजगारांना प्राधान्य देण्यात येईल. इच्छुक उमेदवारांनी आपले आवेदन पत्र निदेशक, स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थान, वाहने पॅलेस, हरिणखेडे पेट्रोलपंप जवळ, तिरोडा रोड, कुडवा (गोंदिया) येथे त्वरित जमा करावे. अधिक माहितीसाठी 9834895077, 8698140105, 8999371797 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे संस्थेचे निदेशक अब्दुल वसीम अब्दुल गणी यांनी कळविले आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *