LatestNewsगोंदियाविदर्भ

विविध उपक्रम व कार्यक्रमाने साजरा होणार माजी आमदार राजेंद्र जैन यांचा वाढदिवस

पदाधिकारी व कार्यकर्ते सज्ज
गोंदिया :
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष राजेंद्र जैन यांचा वाढदिवसाचे औचित्य साधून ८ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तथा मित्र परिवाराच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात माजी आमदार राजेंद्र जैन यांचा वाढदिवस भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार असून यासाठी मित्र परिवार, राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सज्ज झाले आहेत.


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार व गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र जैन यांचा वाढदिवस ८ आगष्ट रोजी साजरा होणारआहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तथा मित्र परिवाराच्या वतीने तयारी सुरू आहे. संपूर्ण जिल्ह्यात राजेंद्र जैन यांचा वाढदिवस भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार असून यासाठी विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजनही करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शुभचिंतकांच्या शुभेच्छा स्विकारण्यासाठी माजी आमदार राजेंद्र जैन एन.एम.डी महाविद्यालयाच्या प्रागंणात आयोजित कार्यक्रमात सकाळी ९.३० वाजेपासून उपस्थित राहणार आहेत.
……………
विविध कार्यक्रमांचे आयोजन
मित्र परिवार व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजी आमदार राजेंद्र जैन यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त ८ ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमांची सुरूवात गौ-माता पूजन, शहर व जिल्ह्यात ठिकठिकाणी आरोग्य शिबीर, नेत्ररोग शिबिर, रोगनिदान शिबीर, वृक्षारोपण, फळ वितरण व शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप यासह विविध कार्यक्रमांचे आयोजित आहेत. त्याचप्रमाणे गोंदिया शिक्षण संस्थाद्वारा संचालित शैक्षणिक संस्थांचे वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजित करण्यात आले आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *