LatestNewsUncategorizedगोंदियाविदर्भ

Mla vinod agrawal; राष्ट्रीयकृत बँक अधिकाऱ्यांची आमदारांकडून कानउघाडणी

कर्ज वितरणात दिरंगाई, पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे बँकांना दिले निर्देश

गोंदिया : एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार शेतकऱ्यांना समृद्ध, सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्नशील आहे, तर दुसरीकडे राष्ट्रीयकृत बँकांकडून वेळेवर कर्ज न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना पीक घेणे कठीण होत आहे. देशातील ही पहिलीच सरकार आहे, जिने शेतकऱ्यांच्या हितासाठी सहकार मंत्रालयाची स्थापना केली. पण दुर्दैव म्हणजे आजही आपला अन्नदाता यंत्रणेच्या अकार्यक्षमतेमुळे विवश आणि हतबल झाला आहे.आज दिनांक ४ ऑगस्ट रोजी पंचायत समिती गोंदिया येथे आमदार विनोद अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या वाटपाचा आढावा घेण्यासाठी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या माध्यमातून एक बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत हे स्पष्ट झाले की राष्ट्रीयकृत बँकांना पीक कर्ज वाटपासाठी दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यात त्यांनी स्पष्टपणे हलगर्जीपणा दाखवला आहे.या विषयावर आमदार विनोद अग्रवाल यांनी गोंदिया तालुक्यातील को-ऑपरेटिव्ह सोसायट्या, ग्रामीण बँक आणि राष्ट्रीयकृत बँकांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या उद्दिष्टांची माहिती घेतली. यामध्ये असे निदर्शनास आले की ग्रामीण बँक वगळता इतर राष्ट्रीयकृत बँकांनी दिलेल्या उद्दिष्टापैकी केवळ १०% कर्जच शेतकऱ्यांना वितरित केले आहे. यावर आमदार विनोद अग्रवाल यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले आणि ठरलेल्या वेळेआधी उद्दिष्ट पूर्ण करण्याचे कठोर निर्देश दिले.यासोबतच आमदार विनोद अग्रवाल यांनी सांगितले की, सेवा सहकारी सोसायट्यांचे जे शेअर्स बँकेत ठेवले जात होते, ते आता सोसायट्यांमध्येच ठेवले जाणार आहेत, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून, ते लवकरच होणाऱ्या पहिल्या सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव मंजूर करतील. सोसायटी आणि बँक यांच्या नोंदींमध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठीसुद्धा बँकेला सूचना करण्यात आल्या असून, जीडीसीसी बँक यावर सकारात्मक पावले उचलेल. त्याचबरोबर नवीन सभासदांचे प्रस्ताव मंजूर करण्याचे निर्देशही अधिकाऱ्यांना देण्यात आले.या आढावा बैठकीत आमदार विनोद अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीचे सभापती मुनेश रहांगडाले, सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक श्री. रोकडे, पंस खंड विकास अधिकारी श्री. पिंगळे, एपीएमसीचे संचालक श्री. ठाकूर, पंचायत समिती सदस्य श्री. शंकर टेंभरे, ववीर इनायतजी इत्यादी उपस्थित होते.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *