BMC On Conjuntivitis : मुंबईकरांनो ‘या’ लक्षणांना हलक्यात घेऊ नका! लगेच डॉक्टर गाठा, महापालिकेने केलं आवाहन
कोरोनानंतर आता आणखी एका संसर्गजन्य आजाराने डोकं वर काढलं आहे. मुंबईसह महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कन्जक्टीव्हायटीस (Conjuntivitis) म्हणजेच डोळे येण्याचे रुग्ण वाढले आहेत. ही रुग्णसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयांना सतर्क केले आहे. महानगरपालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग या रुग्णसंख्या वाढीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. ज्यांना हा संसर्ग झाला असेल त्यांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. मुंबईमध्ये डोळे येण्याची साथ पसरू नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्री. इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने विविध उपाययोजना हाती घेतल्याची माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी दिली. मुंबईमध्ये डोळे येण्याच्या संसर्गामध्ये (Conjuntivitis) अद्याप कोणतीही लक्षणीय वाढ झालेली नाही. मात्र सध्या मुंबईत पाऊस सुरू असल्याने हवेतील आर्द्रता वाढून डोळे येण्याची विषाणूजन्य साथ पसरू शकते. ही साथ ‘अत्यंत सांसर्गिक’ आहे आणि तिचा प्रसार रोखण्यासाठी डोळ्यांची योग्य निगा राखणे आवश्यक आहे. संसर्ग झाल्याची लक्षणे