LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास!

गोंदिया जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
२५ हजारांचा दंड, जखमीला २० हजार नुकसानभरपाई देण्याचे आदेश
गोंदिया : जुन्या वादाच्या रागातून एका तरुणाचा खून करण्याच्या उद्देशाने त्याच्या डोक्यावर लोखंडी पट्टीने प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीला गोंदिया जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांच्या न्यायालयाने आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास आणि २५ हजार रुपये दंड अशी सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. तसेच दंडाच्या रकमेतून २० हजार रुपये गंभीर जखमी झालेल्या तरुणाला नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. नरेंद्र कुंभारिया तांडेकर (वय ४०, रा. नवेगावबांध) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
काय होती घटना?
सविस्तर माहितीनुसार, ही थरारक घटना २९ जून २०१६ रोजी घडली होती. गोंदियातील जोगळेकर वॉर्ड येथील रहिवासी असलेले गवंडी मिस्त्री हेमकृष्ण छगन सूरजजोशी हे काम संपल्यानंतर त्यांच्या मालकाचा मुलगा उमेश माधवराव आगाशे (वय २२) याच्यासह दुचाकीने नवेगावबांध येथील टी-पॉईंटजवळील एका नाश्त्याच्या दुकानावर गेले होते. त्यावेळी तेथे उपस्थित आरोपी नरेंद्र तांडेकर याने जुन्या घरगुती वादातून उमेशशी वाद घालण्यास सुरुवात केली.
वाद विकोपाला गेल्यावर आरोपीने जवळील पानटपरी बंद करण्यासाठी ठेवलेली लोखंडी पट्टी उचलून उमेशच्या डोक्यावर ३ ते ४ वेळा जोरदार प्रहार केले. या भीषण हल्ल्यात उमेश रक्तबंबाळ होऊन गंभीर जखमी झाला. उपस्थितांनी त्याला तातडीने नवेगावबांध ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
१९ साक्षीदार तपासले; सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य
याप्रकरणी हेमकृष्ण सूरजजोशी यांच्या तक्रारीवरून नवेगावबांध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. डी. कुनघाटकर यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्यादरम्यान जिल्हा सरकारी वकील ॲड. एम. एस. चंदवानी यांनी १९ साक्षीदार तपासले तसेच भक्कम पुरावे सादर केले.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *