LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

खळबळजनक! लाख खरेदीसाठी गेलेल्या ६० वर्षीय व्यापाऱ्याची निर्घृण हत्या

बोरगाव झुडपी जंगल परिसरातील घटना; अज्ञात आरोपीविरुद्ध गोरेगाव पोलिसात गुन्हा दाखल

गोरेगाव (जि. गोंदिया) : तालुक्यातील ग्रामीण भागात घरोघरी जाऊन पळसाच्या झाडाची लाख (Lakh) खरेदी करणाऱ्या एका ६० वर्षीय वृद्ध व्यापाऱ्याची अज्ञात इसमाने डोक्यात काठीने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बाबूलाल पटले (वय ६०, रा. बाघोळी, ता. गोरेगाव) असे मृत व्यापाऱ्याचे नाव आहे. सदर घटना शुक्रवार, दि. ५ जून रोजी रात्रीच्या सुमारास बोरगाव झुडपी जंगल शिवारात समोर आल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ माजली आहे. मोटरसायकलवरून लागला शोधप्राप्त माहितीनुसार, बाबूलाल पटले हे गेल्या अनेक वर्षांपासून गोरेगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये फिरून लाख खरेदीचा व्यवसाय करायचे. नेहमीप्रमाणे शुक्रवारी सुद्धा ते लाख खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडले होते. दरम्यान, दुपारच्या सुमारास गावातीलच नवरलाल सोनवाने यांना बाबूलाल पटले यांची मोटरसायकल बोरगाव परिसरातील शेतशिवारात बेवारस स्थितीमध्ये उभी असलेली दिसली. त्यांनी तातडीने बाघोळी येथे जाऊन ही माहिती बाबूलाल यांचे सुपुत्र अमित पटले यांना दिली. वडिलांची मोटरसायकल बेवारस उभी असल्याचे ऐकताच अमित व त्याचा लहान भाऊ यांनी तातडीने घटनास्थळ गाठले व आजूबाजूच्या परिसरात शोध सुरू केला.रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेहदिवसभर शोध घेतल्यानंतर अखेर रात्री १२:३० वाजताच्या सुमारास मुख्य रस्त्यापासून अंदाजे २०० मीटर अंतरावर झुडपी जंगलात बाबूलाल पटले यांचा मृतदेह आढळून आला. अज्ञात आरोपीने त्यांच्या चेहऱ्यावर, कानावर आणि डोक्यावर काठीने जबर प्रहार केले होते. जखमा गंभीर असल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता.घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस स्टेशनचे पथक रात्रीच घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठविले. याप्रकरणी मृतकाचा मुलगा अमित बाबूलाल पटले याच्या तक्रारीवरून गोरेगाव पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंविच्या संबंधित कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *