LatestNewsगोंदिया- भंडारामहाराष्ट्रविदर्भ

गाड्या वेळेवर चालविण्याची व प्लॅटफॉर्म बदल करा

DRUCC सदस्य गुड्डू चांदवानी यांनी DRM यांना दिले निवेदन
गोंदिया : 
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर मंडळातील DRUCC रेल्वे समिती सदस्य विनोद (गुड्डू) चांदवानी यांनी गोंदिया रेल्वे स्थानकावरील गाड्यांच्या वेळापालनाबाबत तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या. याबाबतचे निवेदन त्यांनी माजी ZRUCC सदस्य महेश आहूजा यांच्यासह मंडळ रेल्वे व्यवस्थापक (DRM) दीपककुमार गुप्ता यांना दिले.
चांदवानी यांनी सांगितले की, गोंदिया मार्गे धावणाऱ्या अनेक महत्त्वाच्या गाड्या ठरलेल्या वेळेपेक्षा उशिरा स्थानकात पोहोचतात, ज्यामुळे प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागते आणि पुढील प्रवासातही अडथळे निर्माण होतात. प्रवाशांचा वेळ आणि सोय अबाधित ठेवण्यासाठी गाड्या वेळेवर धावाव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
इतर विषयांमध्ये, त्यांनी विशेषतः विदर्भ एक्सप्रेस ही गाडी गोंदिया स्थानकावरून प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून सोडण्यात यावी, अशी मागणी केली. सध्या महाराष्ट्र एक्सप्रेस ही गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून सोडली जाते. मात्र विदर्भ एक्सप्रेसच्या प्रवाशांची संख्या आणि सोयी लक्षात घेता तिला प्लॅटफॉर्म 1 वरून सुटणे अधिक योग्य ठरेल. या बदलामुळे प्रवाशांना चढणे-उतरणे अधिक सोपे होईल आणि गर्दी व्यवस्थापनातही मदत होईल. DRM दीपककुमार गुप्ता यांनी या दोन्ही मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *