LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

समाजवादी क्रांती घडवणे हे शहीद भगतसिंगाचे ध्येय होते : हिवराज उके

भंडारा : क्रांती म्हणजे सोषण व विषमतेवर आधारित सध्या अस्तित्वात असणारी समाजव्यवस्था संपूर्णपणे बदलून त्या जागी समतेवर आधारित शोषण विहीन समाजवादी समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी क्रांती घडवणे हे शहीद भगतसिंगाचे ध्येय होते हे त्यांचे विचार आजही प्रसंगीत आहेत. त्यासाठी अधिक जोमाने काम करणे व त्यांचे स्वप्न साकार करणे हीच काळाची गरज आणि त्यांच्या स्मृतीला अभिवादन होय असे प्रतिपादन भाकपचे जिल्हा सचिव व दलित अधिकार आंदोलनाचे राज्य सहसचिव कॉम्रेड हिवराज उके यांनी केले.
२३ मार्चला २०२६ ला भाकप कार्यालय कॉम्रेड राणा भवन भंडारा येथे शहीदे आजम भगतसिंग आणि शहीद सुखदेव व शहीद राजगुरू यांच्या ९५ व्या स्मृतिदिना प्रित्यर्थ अभिवादन सभा आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी कॉम्रेड हिवराज उके बोलत होते.अध्यक्षस्थानी जेष्ठ कम्युनिस्ट पुढारी कॉम्रेड सदानंद इलमे होते. संचालन तालुका सचिव कॉम्रेड गजानन पाचे यांनी केले तर आभार कॉम्रेड ताराचंद देशमुख यांनी मानले.
या प्रसंगी प्रामुख्याने सर्व कॉम्रेड वामनराव चांदेवार,गणेश क्षीरसागर, विलास शेबे, गोपाल चोपकर, निशा रोडगे, छबी पाचे, सरस्वता देशमुख, कान्हा मदारकर,घनश्याम नागोसे इत्यादींची उपस्थिती होती.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *