LatestNewsगोंदिया- भंडारामहाराष्ट्र

malaria  : जिल्ह्यात हिवताप रुग्ण रोखण्यात आरोग्य विभागाला यश

गोंदिया : आपला जिल्हा हा जंगलव्याप्त भाग,घनदाट झाडी व झुडपेने नटलेला आहे.तसेच जिल्ह्यात अतिवृष्टी मुळे पाण्याचे डबके साचलेले दिसतात.डास व डास अळीसाठी पोषक वातावरण असते.जिल्ह्यात बाराही महिने हिवताप आजाराचे (malaria) रुग्ण निघत असतात.त्यामुळे हिवतापाचा प्रसार रोखायचा असेल तर मच्छरांसोबत डास अळी सुद्धा नष्ट करणे गरजेचे बनलेले असते. मलेरियाचा (malaria)  प्रसार रोखण्यासाठी डासांपासून मानवांमध्ये संक्रमण आणि मानवांकडून डासांमध्ये संक्रमण यापैकी कोणताही एक घटक खूप कमी झाला तर त्या भागातून मलेरियाचे उच्चाटन होऊ शकेल त्यामुळेच जोखीमग्रस्त भागात रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषधांसोबतच डासांचे निर्मूलन किंवा चावण्यापासून बचाव करण्यासाठी उपाययोजना केल्या जाणे आवश्यक असल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण यांनी म्हटले आहे.
2024 वर्षी जिल्ह्यात 5,01,898 संशयित व्यक्तींचे रक्त नमने घेवुन तपासण्यात आले. त्यात 353 हिवताप (malaria)  रुग्ण आढळुन आले होते.त्यापैकी पी.एफ.म्हणजे जीवघेण्या आजाराचे 253 रुग्ण आढळले होते.त्यावेळी जिल्ह्याचा स्लाईड पॉझिटिव्हिटी दर 0.05 होता.वर्ष ऑक्टोंबर 2025 पर्यंत जिल्ह्यात 7,61,339 संशयित व्यक्तींचे रक्त नमने घेवुन तपासण्यात आले.त्यात 194 हिवताप रुग्ण आढळुन असुन त्यापैकी पी.एफ.म्हणजे जीवघेण्या आजाराचे फक्त 136 रुग्ण आढळले आहेत.तसेच आता जिल्ह्याचा स्लाईड पॉझिटिव्हिटी दर घसरुन 0.02 झाला आहे.
जिल्ह्यात वर्ष 2024 व 2025 तुलनात्मक अभ्यास केला तर  2025 हिवतापाचे रुग्ण संख्या, स्लाईड पॉझिटिव्हिटी दर नियत्रंण ठेवण्यात आरोग्य विभागाला यश आलेले आहे.डासोत्पती स्थानात गप्पी मासे सोड मोहीम,डी-लार्वा फवारणी,एक दिवस-एक गाव अभियान सर्वेक्षण मोहिम व आठवडी कोरडा दिवस पाळणे मोहीम” प्रतिबंधात्मक उपायोजना प्रभावीपणे राबविण्याचे फळ दिसत असल्याचे डॉ.विनोद चव्हाण यांनी माहीती दिली आहे. यासाठी जिल्ह्यातील तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, समुदाय आरोग्य अधिकारी, फार्मासिस्ट, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका,आशा सेविका व स्वयंसेवक यांचे सोबत गावातील पदाधिकारी यांचे भरीव योगदान लाभलेले आहे.

“डासोत्पती स्थानात गप्पी मासे सोड मोहीम, डी-लार्वा फवारणी,एक दिवस-एक गाव सर्वेक्षण अभियान व आठवडी कोरडा दिवस पाळणे मोहीम ” प्रतिबंधात्मक उपाययोजना ठरले संजीवनी :  जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण
कीटकजन्य आजाराला आळा घालण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात विविध प्रतिबंधात्मक उपायोजना राबविल्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा हिवताप रुग्ण संख्येत घट झाल्याची माहीती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद चव्हाण यांनी दिली आहे.आरोग्य विभाग,हिवताप विभाग व एम्बेड अशासकीय संस्थेच्या सहकार्याने जिल्ह्यात किटकजन्य आजार नियंत्रणासाठी विविध प्रतिबंधात्मक उपायोजना राबविल्याचे फलित म्हणुन हिवताप रुग्ण संख्या रोखण्यात आरोग्य विभागाला यश आल्याचे चित्र दिसत असल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण यांनी माहीती दिली आहे.
……………………………..
किटकजन्य आजार नियंत्रणाकरीता जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या उपाययोजना
मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशान्वये सर्व ग्रामपंचायतींना पत्र देण्यात आले व सर्व ग्रामपंचायती मार्फत लार्वीनाशक डी-लार्वा ची दर आठवडी फवारनी करण्यात येते.
एप्रील व मे महिन्यात कामानिमित्त स्थलांतरीत झालेल्या ७७०९ मजूरांचे जून व जुलै महिण्यात परत आल्यानंतर तात्काळ शोध घेवून रक्त नमुने घेण्यात आले व ४६ दूषीत रुग्णास वेळीच वैद्यकिय अधिकारी व आरोग्य सहाय्यक यांच्या निगरानीत औषधोपचार देण्यात आले.
जून हिवताप प्रतिरोध व जूलै डेंग्यू प्रतिरोध महिना साजरा करुण मोठ्या प्रमाणत जनजागृती करण्यात आली.
मागील वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी प्रतिबंधाच्या दृष्टीकोनातुन २.५ लाख रक्तनमूने जास्त घेण्यात आले.
दरमहा प्रत्येक शनिवार कोरडा दिवस म्हणून विशेष अभियान राबविण्यात येत आहे.
४ ते ९ ऑगष्ट व १५ ते २१ सप्टेंबर महिण्यात डासोत्पत्ती स्थानात गप्पी मासे सोडण्याची धडक मोहिम राबविण्यात आली.
एच.आय.१० च्या वर व ३ ते १० असलेल्या गावात विशेष लक्ष देवुन जलद ताप मास सर्वेक्षण करण्यात आले व ग्रामपंचायती मार्फत लार्वानाशक डी-लार्वाची फवारणी करण्यात आली.
७ ते १८ ऑक्टोबर या कालावधित किटकजन्य आजार नियंत्रणकरीता एक दिवस एक गाव अंतर्गत विशेष सर्वेक्षण मोहिम राबविण्यात येत आहे.
जूलै महिण्यात शाळा सुरु झाल्यानंतर सर्व आश्रमशाळेतील ९२०९ विद्यार्थ्याची हिवतापाकरीता रक्त तपासणी करण्यात आली व १६ दुषित रुग्णास वेळीच वैद्यकिय अधिकारी व आरोग्य सहाय्यक यांच्या निगरानीत औषधोपचार देण्यात आले.
९३ गावात किटकनाशक फवारनी करण्यात आली.
१० दिवशीय फिरती प्रमाणे आरोग्य कर्मचारी यांच्या नियमित गृहभेटीत जुन, जुलै, ऑगष्ट महिण्यात सर्व आरोग्य कर्मचाऱ्याना कमीत कमी १०० रक्त नमूने घेण्यावर भर देण्यात आला.
दरमहा गटसभा व शाळा यांचेमार्फत समाजात जनजागृती करण्यात आली.
दरमहा वर्तमानपत्रात किटकजन्य आजाराबाबत जनजागृती करण्यात आली.
जिल्हा व तालुकास्तरीय पर्यवेक्षकामार्फत सर्व प्रा आ केंद्राचे दैनंदिन पर्यवेक्षण करण्यात आले.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *