Road accident : ट्रकने दुचाकी चालकांना चिरडले; पती पत्नीचा जागीच मृत्यू
अर्जुनी – तावशी फाट्यावर भीषण अपघातकालच आटोपला मुलाचा साक्षगंध कार्यक्रम
अर्जुनी मोरगाव : वडसा – अर्जुनी मार्गावर अर्जुनी लगत तावशी फट्यावर एक विचित्र अपघाताची घटना आज ता.२९ रोजी सायंकाळी ६.३० दरम्यान घडली आहे. यात ट्रक आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात Road accident दुचाकीवरील दोन पती पत्निंचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना घडलीय. मुखरू जीवन नाकाडे (वय ६२) आणि मालता मुखरू नाकाडे (वय ५७) रा. टोला कोरंभी अशी दोन्ही मृत्कांची नावे आहेत.सविस्तर वृत्त असे की, मृतक दांपत्ये अर्जुनी मोरगाव येथे आपल्या नातेवाईकाकडे कथा आटोपून स्व-गावी जाण्यासाठी निघाले असता अर्जुनीच्या बाहेर तावशी टी पॉईट जवळ समोरून वडसा अर्जुनी मार्गे टमाटर भरून जात असलेल्या ट्रक क्रमांक ट्रक एपी ३७ टिके १५८९ चालकाने समोरासमोर जोरदार धडक Road accident दिली. धडकेत दुचाकी हिरो स्प्लेंडर क्रमांक एम एच ३५ एम ६३०१ दुचाकी चालक मुखरू नाकाडे व त्यांच्यासह त्यांच्या पत्नी मालता यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी मृत्युच्या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी पुढील प्रक्रिया सुरू केली आहे. दोघेही पती-पत्नी नातेवाईकाकडे कथेच्या जेवणाला आले होते. कथा कार्यक्रम आटोपून निघाले असता समोरून आलेल्या ट्रकने Road accident जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की दोघांचाही जागीच मृत्यू झाला मात्र मृतक मुखरू नाकाडे यांच्या डोक्यावरून ट्रक गेल्याने डोका पुर्णतः चकनाचूर झाल्याची माहिती समोर आली आहे. दुचाकी ट्रक मध्ये फसून असल्याने ट्रक चालकांना पळता आलं नाही. लागलीच माहिती अर्जुनी मोरगाव पोलिसांना मिळताच अर्जुनी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करून दोन्ही मृतकांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव येथे पोहोचवले.

