LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

Anti Corruption Bureau : नोकरी लाऊन देण्यासाठी लाच मागणारा सभापती व लिपीक एसीबीच्या जाळ्यात

भंडारा लाच लुचपत विभागाची कारवाई

गोंदिया : कृषी उत्पन्न बाजार समिती, गोंदिया येथे स्थायी कर्मचारी म्हणून नियुक्ती देणे करिता व तशी ऑर्डर काढण्याकरिता अडीच लाख रुपयांची लाच मागणारे सभापती व कनिष्ठ लिपीकाला तडजोड अंती दीड लाख रुपये लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. ही सापळा कारवाई भंडारा येथील लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली. या कारवाईने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. लाचलुचपत विभागाने (Anti Corruption Bureau) पळताळणी करून आज २९ सप्टेंबर रोजी सापळा रचला. कनिष्ठ लिपिकाला १ लाख ५० हजार रुपयाची लाच घेतांना पंचा समक्ष पकडण्यात आले. त्याच बरोबर या प्रकरणात सहभागी असलेल्या सभापतीलाही अटक करण्यात आली. भाऊराव उके, सभापती कृउबास गोंदिया, हेमेंद्र उर्फ सोनु चुन्नीलाल पटले, कनिष्ठ लिपिक कृउबास गोंदिया असे लाचखोर आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपी विरुद्ध गोंदिया शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणात दोन्ही आरोपीला अटक करण्यात आली आहे.सविस्तर असे की, फिर्यादी कृउबासमध्ये गेल्या अनेक वर्षापासून अस्थायी म्हणून कार्यरत आहेत. फिर्यादीसह आणखी एक कर्मचारी असे दोन कर्मचाऱ्यांना स्थायी नियुक्ती देण्यात आली नव्हती. त्यामुळे दोन्ही कर्मचाऱ्यांचा स्थायी म्हणून नियुक्ती करण्यात यावी, यासाठी लढा सुरू होता. त्यातच सभापती भाऊराव उके यांच्याशी त्यांनी संपर्क साधले. दरम्यान स्थायी कर्मचारी म्हणून नियुक्ती देण्यासाठी २ लाख ५० हजार रुपयाची फिर्यादीला मागणी करण्यात आली. यामध्ये कनिष्ठ लिपिक सोनु पटले देखील सहभागी होता. या संदर्भात भ्रमणध्वनीरही चर्चा करण्यात आली. मात्र फिर्यादीला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने भंडारा लाचलुचपत विभागाकडे (Anti Corruption Bureau) तक्रार केली. १९ सप्टेंबरला तक्रार नोंद होताच भंडारा लाचलुचपत विभागाने या प्रकरणाची पडताळणी केली.पडताळणी दरम्यान आरोपी सभापती भाऊराव उके व कनिष्ठ लिपिक सोनु पटले हे दोघे लाच मागीत असल्याची बाब समोर आली. दरम्यान वाटाघाटीतून पहिल्या टप्प्यात १ लाख ५० हजार रुपये लाच देण्याचे ठरले. त्यानुरूप आज २९ सप्टेंबर रोजीभंडारालाचलुचपत विभागाने (Anti Corruption Bureau) सापळा रचला. कनिष्ठ लिपिक हेमेंद्र उर्फ सोनु पटले यांने तक्रारकर्त्याकडून १ लाख ५० हजार रुपयाची लाच स्विकारली. या प्रकणात सोनु पटलेला रंगेहात अटक करण्यात आली तर दुसरा आरोपी सभापती भाऊराव उकेलाही अटक करण्यात आली. दोन्ही आरोपी विरुद्ध गोंदिया शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे, अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती माधुरी बाविसकर यांच्या मार्गदर्शनात भंडाराचे उपअधीक्षक डॉ. अरुणकुमार लोहार यांच्या नेतृत्वात पोनि. नितेश देशमुख, पोनि. उज्वला मडावी, उपपोनि. संजय कुरंजेकर, पो. हवा. प्रतिक उके, चेतन पोटे, मयुर सिंगनजुडे, विष्णू वरठी, हितेश हलमारे, हिला लांडगे, राजकुमार लेंडे, पंकज सोरते यांनी केली.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *