LatestNewsगोंदियाविदर्भ

डिएचओ डॉ.गोल्हार यांची देवरी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाला आकस्मिक भेट

स्वस्थ नारी सशक्त परिवार,आश्रमशाळा गोवर रुबेला लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबवा : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार
गोंदिया :
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांनी लोकांना आरोग्य संस्थेत विविध गुणवत्तापुर्ण सुविधा मिळण्याच्या दृष्टीकोनातुन जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, आपला दवाखाना, शहरी आरोग्यवर्धिनी उपकेंद्र व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयांना भेटी देणे वाढविले आहे. भेटीतुन ग्रामिण लोकांना मुलभुत आरोग्य सुविधा देण्याबाबत विविध कार्यक्रम व योजनांचा आढावा घेत आहेत.देवरी हा जिल्ह्यात अतिदुर्गम व बॉर्डरलाईन तालुका असल्याने विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याचे सांगितले आहे.
दि.24 सप्टेंबर रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांनी देवरी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाला आकस्मिक भेट देवुन देवरी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ललित कुकडे यांच्याशी तालुक्यात विविध आरोग्य संस्थामार्फत दिल्या जाणार्या कार्यक्रम व योजनांची माहीती जाणुन घेतली.त्यावेळी त्यांचे सोबत जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. निरंजन अग्रवाल उपस्थित होते. डॉ.अभिजीत गोल्हार यांनी मुख्यालयात राहुन आरोग्य सेवा पुरविणे,कार्यक्षेत्रातील गावांमध्ये कुठलीही तक्रार येणार नाही या बाबत सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी दक्षता घेणे, आरोग्य संस्थेतील आतील व बाहेरील परिसराची स्वच्छता परिचरांनी नियमित ठेवणे, निरुपयोगी व भंगार साहित्यांचे निर्लेखन मार्गदर्शक सुचनेनुसार कार्यवाही करणे,बाह्यरुग्ण सेवा गुणवत्तापुर्ण देवुन दिवसाच्या दोन्ही वेळेत ओपीडी सुरळीत ठेवण्याच्या सुचना यावेळी दिल्या. भेटी दरम्यान सध्या सुरू असलेल्या “स्वस्थ नारी सशक्त परिवार”तसेच आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या गोवर रूबेला लसीकरणाबाबत माहिती घेतली त्याचप्रमाणे इतर आरोग्यविषयक कामाबाबत विचारणा करून केलेल्या कामाची आकडेवारी संबंधित पोर्टलवर तसेच ॲपवर दररोज न चुकता भरण्याबाबतच्या सूचना दिल्या. तालुक्यात मोबाईल कर्करोग व्हॅन द्वारे संशयित कर्करोग लक्षणे असलेल्या रुग्णांना तपासणी साठी आशा,समुदाय आरोग्य अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांचे मार्फत मोबलाईज करुन घेण्याच्या सुचना यावेळी दिल्या. भेटी दरम्यान देवरी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचारी, कार्यक्रम समन्वयक उपस्थित होते.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *