LatestNewsगोंदियाविदर्भ

Adivasi samaj : आदिवासी समाजचा 6 अक्टूबर रोजी जन सैलाब

गोंदिया : 20 सप्टेंबर 2025 ला गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या (Adivasi samaj) संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून सभा आयोजन करण्यात आले होते सभेचे आयोजन शासकीय विश्रामगृह गोंदिया येथे श्री धनराज तुमडाम यांच्या अध्यक्षतेत सभा संपन्न झाली सभेत जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य, सर्व आदिवासी संघटनेचे पदाधिकारी तालुका प्रतिनिधी आणि विद्यार्थी संघटना यांच्या उपस्थितीत सभा संपन्न झाली.
महाराष्ट्र राज्यात हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर बंजारा जातीच्या लोकांनी आदिवासी मध्ये आरक्षण मिळण्याकरिता मोठे आंदोलन सुरू केले आहे . त्या बंजारा समाजाच्या आंदोलनाच्या विरोधात आदिवासी समाजाने लाखोंची संख्या ने मोठे आंदोलन करण्याची तयारी आजच्या सभेत ठरविण्यात आले आहे. आदिवासी समाजाच्या विराट मोर्चा लाखोंची संख्याने गोंदिया येथे येणाऱ्या 06 ऑक्टोबर 2025 ला विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे त्यामध्ये आदिवासी समाज (Adivasi samaj) जंगल दर्यातून , खोऱ्यातून गावा गावातुन येऊन विराट मोर्चात सहभागी होणार आहे. त्याकरिता आदिवासी समाजाने 06 ऑक्टोबर 2025 ला मोठा एल्गार पुकारलेला आहे. त्याचप्रकारे 1,) महाराष्ट्र महसूल मंत्री यांनी घेतलेला निर्णय आदिवासींची जमीन गैर आदिवासीला भाडेतत्त्वावर देण्याची निर्णयाच्या विरोधात मोठा रोष व्यक्त केला आहे. 2) धनगर व बंजारा व इतर गैर आदिवासी समाजाला आदिवासी समाविष्ट करू नये. 3) प्रत्येक गावागावातून आदिवासी मुले, पुरुष , महिला व ज्येष्ठ नागरिक यांनी आदिवासी समाजाच्या (Adivasi samaj) विराट मोर्चात सहभागी व्हावे. 4) महाराष्ट्र शासनाने छोटा बिंदू नामावली नियम लागू करणे. व अनेक मागण्यांचे नियोजन करून आजच्या सभेत सर्व संमतीने ठराव घेण्यात आला की येणाऱ्या 06 ऑक्टोंबर 2025 ला मोठ्या संख्येने आदिवासी समाज (Adivasi samaj) जिल्हास्तरीय पोषण विराट मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे आजच्या सुमित उपस्थितीत कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष करन टेकाम ऑल इंडिया आदिवासी प्रदर्शित जिल्हाध्यक्ष अनिल वट्टी, नॅशनल महिला फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष छाया टेकाम गोंडवाना मित्र मंडळाचे अध्यक्ष घनश्याम तोडसाम , विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल येल्ले आणि जिल्हा परिषद गोंदियाचे समाज कल्याण सभापती रजनीताई कुंभरे जिल्हा परिषद सदस्य पूजाताई धुर्वे, प्रीतीताई कचलाम,वैशाली पंधरे, विजय टेकाम ,रितेश मलगाम , पंचायत समिती सदस्य प्रमिलाताई भलावी , अर्चनाताई मडावी, प्रमिला सिंद्रामे, संगीता पुसाम , शीलाताई उईके, माजी जिल्हा परिषद सदस्य जियालाल पंधरे, दुष्यंत किरसान, चेतन उईके, शंकर मळावी सालेकसा, यादोरावजी भोयर आमगाव, अजय कोठेवार गोरेगाव , मुरारी पंधरे मोरगाव अर्जुनी , शामराव उईके तिरोडा, एडवोकेट विवेक धुर्वे, दुर्गेश कडपते , जगनलालजी धूर्वे, शत्रुघन मरसकोल्हे, नंदकिशोर उईके, रमण सलाम व इतर आदिवासी समाजाचे सर्व प्रतिनिधी उपस्थित होते.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *