bhandara News : भंडारा जिल्हयाला अग्रेसर ठेवण्यासाठी प्रयत्नशील : पालकमंत्री संजय सावकारे
जिल्हयात 15 ग्रामस्तरीय मृद परिक्षण प्रयोगशाळा उभारणार
भंडारा : भंडारा जिल्हयाला आरोग्य,शिक्षण ,शेती,उदयोग,महिला सक्षमीकरण,जलसंधारण आणी उर्जा यासोबत अनेक विभागात चांगले काम सुरू आहे,भंडारा जिल्हयाला अग्रेसर ठेवण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री संजय सावकारे यांनी आज केले. पोलीस कवायत मैदानातील 79 व्या स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी खासदार प्रशांत पडोळे, जिल्हाधिकारी सावनकुमार ,मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींदकुमार साळवे, पोलीस अधिक्षक नुरूल हसन, उपवनसंरक्षक योगेंद्र सिंह यांच्यासह प्रशासनातील सर्व वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. ध्वजारोहण कार्यक्रमानंतर राष्ट्रगीत व पालकमंत्र्यांनी परेड निरीक्षण केले.त्यानंतर त्यांनी भंडारावासींयाना संबोधीत केले.पोलीस,गृहरक्षक दल,छात्रसेना व विदयार्थी यांची मानवंदना व संचलन पार पडले.
जिल्हयातील विकासकामांचा धावता आढावा घेतांना श्री.सावकारे म्हणाले की,जिल्हयाची अर्थव्यवस्था धान,मत्सयउत्पादन या बाबींवर अंवलबुन आहे.धान उत्पादक शेतक-यांच्या हितासाठी शासन वेळोवेळी आवश्यक ते निर्णय घेत असते.त्यामध्ये खरीप हंगाम 2024-25 मध्ये आधारभुत दराने धान खरेदी करण्यात आली असून त्यामध्ये 91 हजार 526 शेतक-यांना सहाशे पासष्ठ कोटी त्रेचाळीस लाख शहान्न्व हजार एवढी रक्कम शेतक-यांच्या खात्यात ऑनलाईन जमा करण्यात आली आहे. तर रब्बी हंगामात 231 केंद्रावर 19 लाख क्विंटल धान खरेदी करून आधारभूत दराप्रमाणे रकमा अदा करण्यात येत आहे. रेशीम शेतीसाठी शेतक-यांनी पुढाकार घेतला पाहीजे.महारेशीम अभियानात 44 एकरवर रेशीम शेतीसाठी नोंदणी झाली आहे. पर्यटन हे या जिल्हयासाठी ग्रोथ् इंजिन ठरणार असून जलपर्यटन प्रकल्पाचे काम सुरू आहे.मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रूग्णालय मदत कक्षाव्दारे 75 रुग्णांना 89 लाख रूपयाची मदत करण्यात आल्याचे श्री.सावकारे यांनी सांगितले.
गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तंना शासकीय नोकरीत पाच टक्के आरक्षणामुळे जिल्हयातील प्रकल्पग्रस्तांना दिलासा मिळाला असुन नोकरीचा मार्ग मोकळा झाला आहे. शेतक-यांना मार्गदर्शनासाठी जिल्हयात 15 ग्रामस्तरीय मृद परिक्षण प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत.सारस संवर्धनाला चांगले यश मिळत असून नुकत्याच झालेल्या सारस गणनेत जिल्हयात 4 सारस पक्षांची नोंद झाली आहे. पालकमंत्री श्री.सावकारे यांनी शंभर दिवस कार्यालयीन सुधारणा मोहिमेत राज्यस्तरावर चांगली काम करणा-या सहायक आयुक्त कौशल्य विकास व उपप्रादेशीक कार्यालय महाराष्ट प्रदुषण नियंत्रण यांचे अभिनंदन केले. परेड संचलनानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार पालकमंत्री श्री.सावकारे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मुकुंद ठवकर व निरंजनी मदनकर यांनी केले. या मुख्य शासकीय कार्यक्रमाला विद्यार्थी, नागरिक ,माध्यम प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.
…………………………………………….

उत्कृष्ट कार्य करणा-यांचा सन्मान
भंडारा : स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य कार्यक्रमात आज पोलीस कवायत मैदानात पालकमंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते विविध शासकीय कार्यालयातील उत्कृष्ट कार्य करणा-या अधिकारी ,कर्मचारी,गुणवंत खेळाडू,गुणवंत क्रीडा मार्गदर्शक ,पोलीस तसेच वन विभागातील ,शंभर दिवस कार्यालयीन सुधारणा मोहिमेत उत्कृष्ट कार्य करणारे कार्यालय प्रमुख यांना सन्मानित करण्यात आले. जिल्हा युवा पुरस्काराने नितीन धांडे यांना सन्मानित करण्यात आले. तर युवक कल्याणासाठी कार्य करणाऱ्या संस्था वर्गवारीतून ग्राम विकास संस्था , भंडारा या संस्थेला सन्मानित करण्यात आले.
वनविभागातर्फे सहाय्यक वनसंरक्षक संजय मेंढे, वनरक्षक निलेश श्रीरामे, वनरक्षक त्रिवेणी गायधने, यांचा सन्मान करण्यात आला . अवयव दानासाठी आवेश देशमुख या अवयव दात्यांसाठी त्यांचे नातेवाईक श्रीमती शोभा देशमुख तर रामदास सिंगनजुडे या अवयव दात्याच्या कार्यासाठी त्यांचे नातेवाईक श्रीमती मालती सिंगनजुडे यांना पालकमंत्री श्री . सावकारे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. 100 दिवसात उत्तम कामगिरी करणाऱ्या उप अधिक्षक,अनिल फुलझेले, वन परिक्षेत्र अधिकारी,वर्षाली नागदेवे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी सुशांत गडकरी , उपविभागीय अधिकारी जलसंपदा विजय छनम, उप प्रादेशिक अधिकारी प्रदुषण नियंत्रण मंडळ किशोर पुसदकर ,साकोली तहसिदार,निलेश कदम, अधिक्षक उपजिल्हा रुग्णालय,नितीन मिसुरकर , उपजिल्हा अधिक्षक कृषी डॉ.किशोर पात्रीकर, उपविभागीय पोलिस अधिकारी आनंद चव्हाण ,तालुका कृषी अधिकारी, आदित्य घोंगरे ,गटशिक्षणाधिकारीशरदचंद्र शर्मा ,अतिरिक्त कार्यकारी अभियंता राम पराडकर ,सहाय्यक निबंधक सहकारी अधिकारी विजय देशपांडे ,सहाय्यक आयुक्त सुधाकर झळके तर जिल्हा क्रीडा पुरस्कारांमध्ये- गुणवंत खेळाडू पुरस्कार- विलास बोरकर, गुणवंत खेळाडू पुरस्कार,कु.पुजा बेंदेवार गुणवंत खेळाडू दिव्यांग पुरस्कार,देवेंद्र भोयर गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार,सुभाष जमजारे गुणवंत खेळाडू पुरस्कार, उमेश नागोसे गुणवंत खेळाडू पुरस्कार,कु.निलोफर पठाण गुणवंत खेळाडू दिव्यांग पुरस्कार,सुदामा शेंडे गुणवंत क्रीडा खेळाडू मार्गदर्शक पुरस्कार,गणेश साकुरे गुणवंत खेळाडू थेट पुरस्कार,ज्योती गडेरिया यांना सन्मानित करण्यात आले.

