Gondia police; जिल्हा पोलीस दलातर्फे अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम कार्यक्रमांतर्गत बाईक रॅलीचे आयोजन
गोंदिया : जिल्हा पोलीस दलातर्फे दिनांक १३ ते १८ ऑगष्ट २०२५ या कालावधी दरम्यान अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम राबविण्यात येत असुन त्या अनुषंगाने श्री गोरख भामरे, पोलीस अधीक्षक गोंदिया यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक १४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०.०० वा. पोलीस मुख्यालय (कारंजा) गोंदिया येथुन बाईक रॅली आयोजन करण्यात आले होते. सदर रॅली ला मा. श्री गोरख भामरे, पोलीस अधीक्षक गोंदिया यांनी हिरवी झंडी दाखवून बाईक रॅली ची सुरुवात केली . सदर अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम बाईक रॅली मध्ये 300ते 350 पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सहभाग घेतला.

सदर बाईक रॅली ची पोलीस मुख्यालय कारंजा, गोंदिया येथुन सुरुवात करून पोलीस मुख्यालय, गोंदिया – शासकीय आय.टी.आय. – फुलचुर नाका – मनोहर चौक जयस्तंभ चौक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक रेल्वे उडान पुल – जे.एम. हायस्कूल – राणी अवंतीबाई चौक – कुडवा नाका एन.एम.डी. कॉलेज रोड – पाल चौक – रेल्वे अंडरपास – यादव चौक भवानी चौक चांदणी चौक गांधी चौक पो.स्टे. गोंदिया शहर रोड – गोरेलाल चौक पं. नेहरु चौक आंबेडकर चौक जयस्तंभ चौक असे गोंदिया शहर व रामनगर चे विविध मार्गाने फिरवून वाहतुक शाखा गोंदिया येथे सदर बाईक रॅली चा समारोप करण्यात आला.
याद्वारे नाशामुक्त समाज घडविणेकरिता गोंदिया जिल्हा पोलीस दलाकडून जनजागृती करण्यात आली. श्री गोरख भामरे, पोलीस अधीक्षक गोंदिया यांचे मार्दर्शनाखाली श्रीमती रोहिणी बानकर, उपविभागीय पोलीस अधीकारी गोंदिया, श्री पुरुषोत्तम अहेरकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, श्री नागेश भाष्कर पो नी वाहतूक शाखा, श्री राजेश सरोदे रा पो नी, श्री श्रीकांत हत्तीमारे पो उप नी नक्षल सेल यांनी सदर बाईक रॅली चे यशस्वी नियोजन केले.

