LatestNewsगोंदियाविदर्भशैक्षणिक

युवा शक्ती स्पोर्ट्स क्लबव्दारे विद्यार्थ्यांना साहीत्याचे वाटप

गोरेगाव :- जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा गोरेगाव अंतर्गत येणा-या हलबीटोला,श्रीरामपूर, चंद्रपूरटोली,गोरेगाव येथील १२० विद्यार्थ्यांना शनिवार( ता०८) युवा शक्ती स्पोर्ट्स क्लबव्दारे शैक्षणिक साहीत्य बाॅस्केट, वह्या,पुस्तके,स्कुल बॅग,पाणी बाटलीचे वाटप करण्यात आले.

यावेळी माजी नगराध्यक्ष आशिष बारेवार, विकास बारेवार, अरविंद जयस्वाल, कलावती जयस्वाल, गुलाबदेवी जैन,प्रविण जैन,रवि ठाकूर, मयुर कटरे,अमोल भेंडारकर, अश्विन रुखमोडे, फतेहसींग सग्गु,अमित बावने,योगेश बारेवार, ओम परिसे, गौरव परधोटे,जय चन्ने,सम्यक जैन, चिन्मय अंबादे, प्रमय जैन,पियुष बारेवार, नितीन रहांगडाले ,मुख्याध्यापक एल बिसेन, शिक्षक सुरजलाल कोल्हारे, दीक्षा बोपचे उपस्थित होते. युवाशक्ती स्पोर्ट्स क्लबव्दारे सतत १० वर्षापासुन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहीत्याचे वाटप करीत असून, सामाजिक कार्यात सहभाग घेत गरजुना मदत करने ,क्रिडा साहित्याचे वाटप करण्याचे कार्य केले जात आहे. यावर्षी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा गोरेगाव अंतर्गत येणा-या चार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हलबीटोला,श्रीरामपूर, चंद्रपूरटोली, गोरेगाव येथील १२० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहीत्याचे वाटप करण्यात आले आहे.या कार्याला निरंतर सुरु ठेवण्यासाठी शहरातील समाजसेवक प्रविण जैन, फतेहसींग सग्गु,अजय पालेवार, अरविंद जयस्वाल, अनील राऊत,नितीन बारेवार, गोपाल हत्तीमारे,सचीन ठाकरे,आनंद चर्जे, सतीश बावनकर,मयुर कोरेकर, अमोल भेंडारकर, अमित बावने यांचा सहकार्य घेतल्या जात आहे.अशी माहीती युवा शक्ती स्पोर्ट्स क्लब व्दारे देण्यात आली.

———————————-

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माझ्या जीवनाचा पाया आहे.माझे शिक्षण केंद्र शाळेत झाले.त्यामुळेच मी इंजीनियरिंग पदवीधर झालो आहे.विद्यार्थी जीवनात गरजु वस्तु किंवा साहीत्य उपलब्ध झाल्यास आपले लक्ष्य सहज प्राप्त करता येते.या उद्देशातून शैक्षणिक साहीत्याचे वाटप केल्या जात आहे.समाजातील प्रत्येक व्यक्तीने सहकार्य करण्याची गरज आहे.

आशिष बारेवार माजी नगराध्यक्ष गोरेगाव

————-‘————————-

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *