LatestNewsगोंदियामहाराष्ट्रविदर्भ

डोंगरगाव पहाडी येथे सीड बॉल विखुरणे व लोकसहभागातून वृक्षलागवड कार्यक्रमाचे आयोजन

गोंदिया : सामाजिक वनीकरण विभाग गोंदिया परिक्षेत्र व्दारे दि.5 ऑगस्ट 2025 रोजी डोंगरगाव पहाडी येथे सीड बॉल विखुरणे व लोकसहभागातून वृक्षलागवडीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास उपवनसंरक्षक पवनकुमार जोंग, विभागीय वन अधिकारी तुषार ढमढेरे, एम.बी.पटेल कॉलेज साकोली (सेवानिवृत्त) रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. एल.पी.नागपूरकर, सहायक वनसंरक्षक पी.एस.तडस, मानद वन्यजीव रक्षक तथा सेवा संस्था अध्यक्ष सावन बहेकार, हिरवळ बहुउददेशीय संस्थेचे अध्यक्ष रुपेश निंबार्ते, वनपरिक्षेत्र अधिकारी शेषराज आकरे, राष्ट्रीय माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय डोंगरगाव प्राचार्य व्ही.एस.काठवटे हे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच राष्ट्रीय माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, डोगरगाव येथील अध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

सर्वप्रथम दिपप्रज्वलन व वटवृक्ष पूजन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात करण्यात आली. त्यानंतर रोपटे देवून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर विभागीय वनअधिकारी तुषार ढमढेरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले. उपवनसंरक्षक पवनकुमार जोंग यांनी विद्यार्थी व पर्यावरण संरक्षणासाठी काम करणाऱ्या संस्थांचे कार्य वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी यांचेपेक्षा जास्त महत्वाचे आहे असे सांगितले. कारण विद्यार्थी व पर्यावरणवादी संस्था हे स्वयंस्फूर्तीने कामे करतात. तसेच डॉ. एल.पी.नागपूरकर यांनी लेह, लदाखचे उदाहरण देवून ऑक्सीजनचे महत्व समजावून सांगितले.याशिवाय पर्यावरण व निसर्ग संरक्षण व संवर्धनासंबंधी काम करणाऱ्या अशासकीय संस्थाचे प्रतिनिधी सावन बहेकार व रुपेश निंबार्ते यांनी पर्यावरण व निसर्ग संरक्षण व संवर्धनाबाबत त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबाबत विद्यार्थ्यांशी हितगुज साधून मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यार्थी व स्वयंसेवी संस्थाचे सदस्य यांच्या मदतीने डोंगरगाव पहाडीच्या सुरक्षित ठिकाणी सीड बॉल विखुरण्यात आले. सदर परिसरात 100 रोपांची लागवड करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन वनपरिक्षेत्र अधिकारी तिरोडा एस.के.आकरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सामाजिक वनीकरण परिक्षेत्र गोंदिया वनरक्षक महेंद्र सुर्यवंशी यांनी अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावली. शेवटी उपस्थितांना अल्पोहार व फळे देवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *