अतिदुर्गम जंगलव्याप्त सिंगनडोह उपकेंद्रात एकाच दिवशी दोन सफल प्रसुती
देवरी : तालुक्यातील बहुतांश ग्रामीण गावे हे आदिवासी,अतिदुर्गम व जंगलव्याप्त असुन आरोग्य विभागाच्या वतीने तेथे गुणात्मक आरोग्य सेवा प्रदान करण्यात येत आहे. दि. 4 जानेवारी रविवारी प्राथमिक आरोग्य केंद्र पालांदुर जमी अंतर्गत उपकेंद्र – सिंगनडोह येथे दोन सफल साधारण प्रसुती करण्यात आल्याची माहीती डॉ.सुरभी गिर्हेपुंजे यांनी दिली आहे.
उपकेंद्र – सिंगनडोह अंतर्गत सुकडी येथील गरोदर माताची प्रसुती सकाळी 7 वाजुन 55 मिनिटानी तर दुसरी रामगड येथील गरोदर माताची प्रसुती सकाळी 8 वाजुन 11 मिनिटानी करण्यात आली.सफल प्रसुती पिएचसी पालांदुर जमीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरभी गिर्हेपुंजे, आरोग्य सेविका साधना डोरले व सिमरन हुमणे यांचे सह आशा सेविका ललिता मिरी,शशिकला नरेटी व वंदना दर्रो यांच्या मदतीने करण्यात आली.देवरी पासुन सिंगनडोह 30 कि.मी. दुरीवर असुन आदिवासी,अतिदुर्गम व जंगलव्याप्त भाग म्हणुन ओळखला जातो.अशा ठिकाणी आरोग्य सेवा देण्यात आरोग्य विभाग सक्षम असल्याचे चित्र दिसत आहे.
दोन्ही मातांची साधारण प्रसुती झाल्यानंतर आरोग्य संस्थेत भरती करुन निगराणी ठेवण्यात येत आहे.रामगड येथील मातेला बाळाचे वजन 3.2 कि.ग्रॅ आहे. सुकडी येथील मातेला मुलीचे वजन 2.5 कि.ग्रॅ आहे.प्रसुती अंती दोन्ही माता व बाळांची प्रकृती उत्तम असुन बाळांचे जन्मत: आवश्यक लसीकरण केल्याची माहीती डॉ.सुरभी गिर्हेपुंजे यांनी दिली आहे.आरोग्य संस्थेतील सुविधा व आरोग्य कर्मचार्यांच्या ह्या तत्पर सेवेबद्दल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार,सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंद कुमार वाघमारे,जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.रोशन राऊत व देवरी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.ललित कुकडे यांनी त्यांचे अश्या कौतुक केले आहे.
…………………………………………………………………..
प्रत्येक गरोदर महिलेचे सुरक्षित बाळंतपण व्हावे म्हणून शासनाच्या वतीने सरकारी आरोग्य संस्थेत मोफत आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहे.त्यामुळे सरकारी रुग्णालयाकडे ओढा वाढला आहे.शहरासह ग्रामीण भागातील प्रत्येक गर्भवती महिलेचे सफल प्रसुती होण्याच्या दृष्टिकोनातुन प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्यवर्धिनी उपकेंद्राचा दर्जा वाढवुन गुणात्मक दर्जा वाढवुन सुरक्षित प्रसूती व्हावी म्हणून केंद्र व राज्य शासनाच्या वतीने राष्ट्रीय आरोग्य अभियान राबविण्यात येत आहे.

