LatestNewsगुन्हेवार्तागोंदिया

Gondia crime: प्रेमप्रसंगातून महिलेची हत्या करून ७ महिन्याच्या बाळाची विक्री

अखेर त्या प्रकरणाचा गोंदिया पोलिसांकडून उलगडा

गोंदिया (Woman Murder Case) : सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी गावालगतच्या शेतशिवारात ३ ऑगस्ट रोजी एका महिलेचे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकरणी डुग्गीपार पोलिसांनी गुन्हा नोंद करून त्या अनोळखी मृतक महिलेची ओळख पटविण्याचे काम हाती घेतले होते. दरम्यान आज (ता.२२) या प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केला. सदर मृतक महिलेचे नाव अन्नु नरेश ठाकूर (२१) रा.भिलाई (जि.दुर्ग, छग) येथील रहिवासी असल्याचे तपासातून समोर आले. (Woman Murder Case) आरोपींनी पैशासाठी सदर महिलेची हत्या करून तिच्या बाळाची विक्री करण्यात आल्याचे उघड झाले आहे.खजरी शेतशिवारात शेत कामासाठी जात असलेल्या शेतकर्‍यांना एका २५ ते २६ वर्षाच्या महिलेचे मृतदेह बाध्यात पडून दिसले. सदर महिला कोण अशी चर्चा सुरू झाली. मृतक महिलेची ओळख पटली नाही. सदर महिलेचा गळा चिरून हत्या करण्यात आली असावी, असा संशय बाळगला जात आहे. या घटनेची माहिती डुग्गीपार पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला असता मृतक महिलेच्या गळ्यावर धारदार शस्त्राच्या खुणा दिसून आल्या. तसेच रक्ताने माखलेला शरीर होता. त्यामुळे सदर (Woman Murder Case) महिलेची हत्या करून आरोपींनी पळ काढला असावा, असा प्राथमिक चौकशीतून दिसून आले. यावरून डुग्गीपार पोलिसांनी या घटनेची नोंद तपासकार्याला सुरूवात केली.सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने सुरू असतानाच पोलिसांकडून वेगवेगळे पथक तयार करण्यात आले होते. तांत्रीक विश्लेषण व गोपनीय माहितीनुसार अनोळखी मृतक महीला ही भिलाई छत्तीसगढ येथील रहीवासी आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी शहनिशा केली असता सदर अनोळखी महिला छत्तीसगढ राज्यातील भिलाई अन्नु नरेश ठाकुर (२१) असल्याचे निष्पन्न झाले. मृतक महीलेची ओळख पटल्यानंतर तांत्रीक विश्लेषणाचे आधारे आरोपीचा शोध घेणे सुरू झाले. दरम्यान या (Woman Murder Case) प्रकरणी पोलिसांनी अभिषेक सिध्दार्थ तुरकर (३६) रा.भिलाई जि.दुर्ग छत्तीसगढ, ह.मु.डोंगरुटोला (कवलेवाडा) गोरेगाव याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याचे अन्नु नरेश ठाकुर हीचे सोबत अनैतिक प्रेमसंबंध होते. तसेच आरोपी हा कर्जबाजारी झाला होता. त्यामुळे त्याला पैशाची गरज असल्याने त्याने पत्नी, बहिण व नातेवाईकासोबत मिळून अन्नु ठाकुर हीचा खुन केला. तसेच मृतकच्या मुलगा धनराज (७ महीने) याची विक्री करून पैसे मिळविण्यासाठी कट रचला. व २ ऑगस्ट रोजी अभिषेक सिध्दार्थ तुरकर यांने अन्नु ठाकुर हिला भिलाई येथून मोटारसायकलने खजरी शेतशिवारात आणुन चाकुने वार करून तिची हत्या केल्याची कबूली दिली. या प्रकरणी पोलिसांनी ७ आरोपीविरूध्द गुन्हा नोंद केला आहे.बनावट जन्म प्रमाणपत्राने बाळाची विक्रीआरोपी अभिषेक सिध्दार्थ तुरकर, त्याची पत्नी पुनम तुरकर, बहिणी चांदणी व प्रिया तुरकर यांनी पैशासाठी अन्न ठाकूर हिची हत्या करून तिच्या ७ महिन्याच्या बाळाची बनावट जन्म प्रमाणपत्राच्या आधारे विक्री केली. या प्रकरणी पोलिसांना सुरेखा रमेश चौहान रा.गड्डाटोली, प्रिति विकास कडबे रा.कस्तुरबा वार्ड, भावेष अशोक बन्सोड रा.मनोहर कॉलोनी, कमल सुकलाल यादव रा.गड्डाटोली यांना व गुन्ह्यातील मुख्य आरोपी अभिषेक सिध्दार्थ तुरकर, सौ.पुनम तुरकर दोन्ही रा.नेहरुनगर भिलाई, प्रिया तुरकर रा.मुर्री, सुरेखा रमेश चौहान रा.गड्डाटोली, प्रिति कडबे रा.कचरा मोहल्ला, भावेष अशोक बन्सोड रा.रामनगर, कमल यादव रा.गड्डाटोली यांना ताब्यात घेण्यात आले.यांनी केली कारवाईही (Woman Murder Case) कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पुरूषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि धिरज राजुरकर, मपोउपनि वनिता सायकर, पो.उप.नि. शरद सैदाने, स.फौ.राजेन्द्र मिश्रा, सुजित हलमारे, संजय चव्हाण, महेश मेहर, सोमेन्द्रसिग तुरकर, दिक्षीतकुमार दमाहे, सुबोधकुमार बिसेन, प्रकाश गायधने, इंद्रजित बिसेन, दुर्गेश तिवारी, तुलसीदास लुटे, भुवनलाल देशमुख, भोजराज बहेकार, विठ्ठलप्रसाद ठाकरे, राजकुमार खोटेले, रियाज शेख, छगन विठ्ठले, हंसराज भांडारकर, संतोष केदार, राकेश इंदुरकर, सुनिल डहाके, राहुल पिंगळे, दुर्गेश पाटील, स्मिता तोंडरे, कुमुद येरणे, रोशन येरणे, योगेश रहिले, अश्विन वंजारी, लक्ष्मण बंजार, मुरली पांडे, घनश्याम कुंभलवार, राम खंडारे तसेच तांत्रिक शाखेचे सपोनि राहुल दुरशेरवार, पोहवा रितेश लिल्हारे, रवि शहारे, राजु डोंगरे, कल्पेश चव्हाण यांनी केली.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *