आदिवासी कल्याण समिती महाराष्ट्र यांना आदिवासी पीपल फेडरेशनचे निवेदन

गोंदिया : आदिवासी कल्याण समिती महाराष्ट्र राज्य हि आज गोंदिया येथे गोंदिया जिल्यातील आदिवासींच्या विविद्ध समस्या जाणून घेण्याकरिता गोंदिया दौऱ्यावर आली असता ऑल इंडिया आदिवासी पीपल फेडरेशन गोंदिया च्या नेतृत्वात आदिवासी समाजांच्या विविध संघटनांच्या समूहाने आदिवासी कल्याण समिती महाराष्ट्र राज्याचे प्रमुख मा. श्री दौलत दरोडा माजी आमदार तथा आदिवासी कल्याण समिती महाराष्ट्र यांच्याशी भेट घेत आदिवासी समाज्याच्या ज्वलंत संशय विषयी अवगत करण्यात आले. गोंदिया जिल्हा हा आदिवासी बहुल असून पण गोंदिया जिल्ह्याच्या ठिकाणी आदिवासी मुलांमुलींकरिता शासकीय वसतिगृह, आदिवासी समाजाकरिता समाज भवन करीत जमीन उपलब्ध करून देणे, ११५०० बोगस आदिवासी यांना आधिसंख्या पदावरून निष्कासित करून त्वरित स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून स्वतंत्र ११५०० आदिवासी समाजातून भरण्यात यावे अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
निवेदन देताना आदिवासी पीपल फेडरेशन जिल्हा अध्यक्ष श्री करण टेकाम, संगिता पुसाम महिला फेडरेशन, गोंडवाना मित्र मंडळ अध्यक्ष श्री घनश्याम तोड़साम, विद्यार्थी संघटेनचे श्री निळकंठ चिचाम माजी नगर प. सदस्य प्रमिला सिन्द्राम, ललिता ताराम,राधिका सलामे सरिता धनबाते, माजी नगर प. सदस्य श्री विनोद पंधरे , दिलेश्वर मडावी सह समाज बांधव उपस्थित होते.