औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन तंत्रज्ञान अभ्यासक्रम सुरु
ऑगष्ट महिन्यापासून प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे
भंडारा : त्यानुसार राज्याच्या कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभागाकडून व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत भंडारा जिल्ह्यातील शामराव बापू कापगते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था साकोली येथे सोलर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) न्यू एज कोर्सकरिता ऑगष्ट महिन्यापासून प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. या कोर्सचे प्रशिक्षणार्थीना विविध क्षेत्रामध्ये रोजगार संधी उपलब्ध असून अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्ष एवढा आहे. या अभ्यासक्रमाचे प्रवेशाकरिता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था साकोली येथे संपर्क करून प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी विजय लाकडे यांनी केले आहे.
सौर उर्जेचे नवीन तंत्रज्ञान व्यापक स्वरुपात वाढत आहे तसेच केंद्र शासन पी. एम. सुर्यघर योजनेची अंमलबजावणी विस्तृत स्वरुपात करत आहे. सौर उर्जा उद्योगांना लागणारे तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी राज्यातील निवडक औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा समावेश असलेले अभ्यासक्रम सुरु करण्याचा निर्णय घेतला असून कौशल्य विकास, रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री, मंगलप्रभात लोढा यांचे सततच्या पाठपुराव्यामुळे दिनांक २८ जुलै रोजी केंद्रीय प्रशिक्षण महानिदेशालय नवी दिल्ली यांचे कडून संलग्नता प्राप्त झाली आहे.